भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजीचे प्रदर्शन उत्तम असे राहिले आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आणि अर्धशतके केली आहेत. तसेच सध्याचा घडीला विराट कोहली, रोहित शर्मासुद्धा काही अशाच प्रकराची फलंदाजी करत आहे. भारतीय संघाने सुरुवातीपासूनच चांगले फलंदाज मिळत गेले आहेत, हेच करण आहे की भारतीय संघाचे प्रदर्शन उत्कृष्ट होत आहे.
भारताने खूप विस्स्पोटक असे फलंदाज देखील घडवले आहेत. त्यात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, सुरेश रैना यांससारखे खेळाडू आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. सध्याचा घडीला विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू आहेत. काही खेळाडू असे असतात जे एखाद्या गोलंदाजाला लक्ष्य करत त्याच्या षटकात अधिकाधिक धावा काढण्याचा प्रयत्न करतात.
आज आपण अशा ३ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वात जास्त धावा केल्या आहेत.
३. झहीर खान
ह्या यादीत झहीर खानचं नाव बघून तुम्ही नक्कीच चकित झाला असाल की हा तर एक गोलंदाज आहे. परंतु, झहीरच्या नावावर एका षटकात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम आहे. ह्याने हा कारनामा जोधपुरला २०००-०१ च्या हंगामात झिम्बावे विरुद्ध केला होता. झहीरने हेन्री ओलांगाला सनसनी ४ षटकार खेचून एका षटकात एकूण २७ धावा झोडून काढल्या होत्या. त्या षटकात १ धाव ही अजित आगरकरची सुद्धा होती.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय केला होता आणि त्याच सामन्यात सचिनने १५३ चेंडूत १४६ धावांची खेळी केली होती. भारताने ८ बाद २८३ इतकी धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल फलंदाजीला उतरलेल्या झिम्बाब्वेने अँडी आणि ग्रँट या फ्लॉवर बंधूनंच्या अर्धशतकाच्या जोरावर १ विकेटने हा सामना जिंकला होता.
२.सचिन तेंडूलकर
ह्या यादीत सचिनने दुसऱ्या क्रमांकच स्थान पटकावले आहे. सचिनने हा कारनामा न्यूझीलंड विरुद्ध १९९ साली हैदराबादमध्ये केला. क्रिस ड्रमने टाकलेल्या एका षटकात सुंदर चौकार-षटकारांची आतिशबाजी करून सचिनने २८ धावांचा चोपून काढल्या होत्या. ह्यात अजय जडेजाची १ धाव होती.
हा तोच सामना आहे ज्यात सचिनने १५० चेंडूत १८६ धावांचा पाऊस पडला होता आणि भारताने ३७६ इतका महाकाय धावांचा डोंगर उभा केला होता. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ २०२ धावांवर गारद झाला होता आणि हा सामना भारताने १७४ धावांच्या फरकाने जिंकला होता.
१. श्रेयस अय्यर
भारताकडून खेळताना एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला आहे श्रेयस अय्यर याने. श्रेयसने हा पराक्रम वेस्ट इंडीज विरुद्ध २०१९ साली विशाखापट्टानम येथे केला. श्रेयसने रोस्टन चेसच्या एका षटकात खनखणीत ४ षटकार आणि चौकार खेचून एकूण ३१ धावा काढल्या. त्यात पंतच्या एका धावाचे योगदान होते. त्या सामन्यात श्रेयसने एकूण ३२ चेंडूत ५३ धावा केल्या होत्या आणि भारताने तो सामना १०७ धावांनी जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
असे ५ खेळाडू, जे विश्वचषक २०२३ मध्ये भारताकडून बजावू शकतात फिनिशरची भूमिका
‘त्या’ चेंडूनंतर पृथ्वी शॉने ठरवले एका षटकात ६ चौकार मारायचे
शेर कभी बुढ़ा नहीं होता! ३८ वर्षीय हाशिम आमला ‘या’ स्पर्धेत पाडतोय धावांचा पाऊस