भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची बॅट यावर्षी चांगलीच तळपत असल्याचे दिसत आहे. त्याने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत धमाल केली होती. तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता. यानंतर विराट बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही चांगलाच चमकला. त्याला पहिल्या दोन वनडेत खास कामगिरी करता आली नाही. मात्र, तिसऱ्या वनडेत त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावत खास विक्रम आपल्या नावावर केला.
विराटचा विक्रम
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी नाणेफेक झाली. त्याचा निकाल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तसेच, भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी भारतीय संघाने 4.1 षटकात शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या रूपात पहिली विकेट गमावली. मात्र, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीसाठी आला. विराटने यावेळी ईशान किशन (Ishan Kishan) याच्यासोबत 290 धावांची भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी रचली. त्यामुळे भारताने या सामन्यात 8 विकेट्स गमावत 409 धावांचा डोंगर उभा केला. विराटने या सामन्यात 91 चेंडूत 113 धावांची खेळी केली. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 11 चौकारही मारले होते. यासह विराटच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली.
Virat Kohli brings up a brilliant 100 – his 44th in ODI cricket 🙌#BANvIND | https://t.co/SRyQabJ2Sf pic.twitter.com/dE9BQfPp8R
— ICC (@ICC) December 10, 2022
वनडे क्रिकेटमध्ये संघांनी 300 हून अधिक धावसंख्या उभारताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वलस्थानी विराजमान झाला. त्याने यादरम्यान 74च्या सरासरीने आणि 106च्या स्ट्राईक रेटने 4148 धावा चोपल्या आहेत. त्याच्यानंतर या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) दुसऱ्या स्थानी असून त्याने 87च्या सरासरीने आणि 106च्या स्ट्राईक रेटने 3906 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) असून त्याने 87च्या सरासरीने आणि 103च्या स्ट्राईक रेटने 3735 धावा केल्या आहेत. यादीत चौथ्या स्थानी रिकी पाँटिंग (Ricky Ponting) असून त्याने 74च्या सरासरीने आणि 99च्या स्ट्राईक रेटने 3406 धावा केल्या आहेत. तसेच, पाचव्या स्थानी एबी डिविलियर्स (AB De Villiers) असून त्याने 81च्या सरासरीने आणि 129च्या स्ट्राईक रेटने 3320 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त सहाव्या स्थानी पुन्हा एकदा भारतीय खेळाडू म्हणजेच एमएस धोनी (MS Dhoni) असून त्याने 62च्या सरासरीने आणि 113च्या स्ट्राईक रेटने 3290 धावा केल्या आहेत. (Most Runs in ODIs where team total was 300+ virat kohli at the top)
वनडे क्रिकेटमध्ये संघांनी 300 हून अधिक धावसंख्या उभारताना सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (सरासरी आणि स्ट्राईक रेट)
4148 धावा- विराट कोहली (74/106)*
3906 धावा- सचिन तेंडुलकर (87/106)
3735 धावा- रोहित शर्मा (87/103)
3406 धावा- रिकी पाँटिंग (74/99)
3320 धावा- एबी डिविलियर्स (81/129)
3290 धावा- एमएस धोनी (62/113)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशान किशन वर्षाला कमवतोय ‘एवढे’ कोटी, त्याबरोबर कोटींच्या गाड्या आहेत घरात
जे गेल अन् सेहवागलाही नाही जमलं, ते 24 वर्षांच्या किशनने करून दाखवलं; बातमी वाचाच