ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 8 बाद 270 धावांवर आपला डाव घोषित केला. यासोबतच भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी भल्यामोठ्या 444 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने खास पराक्रम गाजवला. तो अशी कामगिरी करणारा भारताचा पाचवा फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले. चला तर त्याच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
विराट कोहलीचा विक्रम
जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये गणला जाणारा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यातील चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर उतरला होता. यावेळी विराटने 23वे षटक टाकत असलेल्या नेथन लायन याच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि 10 धावा पूर्ण केल्या. यासह त्याने खास कारनामा केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटच्या 2000 धावा पूर्ण झाल्या. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावा करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला.
त्याच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3630 धावा केल्या आहेत. तसेच, दुसऱ्या स्थानी व्हीव्हीएस लक्ष्मण असून त्याने 2434 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या राहुल द्रविड याने 2143, चौथ्या स्थानी असलेल्या चेतेश्वर पुजारा याने 2074 धावा केल्या आहेत. (Most Runs in Test by an Indian against Australia Virat Kohli 5th Indian)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय फलंदाज
3630 धावा- सचिन तेंडुलकर
2434 धावा- व्हीव्हीएस लक्ष्मण
2143 धावा- राहुल द्रविड
2074 धावा- चेतेश्वर पुजारा
2001* धावा- विराट कोहली
विराटचा असाही विक्रम
याव्यतिरिक्त विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी आणि वनडे अशा दोन्ही क्रिकेटप्रकारात 2000हून अधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला. त्याच्यापूर्वी सचिनने अशी कामगिरी केली होती. तसेच, वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज सर विवियन रिचर्ड्स आणि वेस्ट इंडिजचेच माजी दिग्गज सलामीवीर डेसमंड हेन्स यांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि कसोटीत 2000हून अधिक धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी आणि वनडेत 2000 धावा करणारे खेळाडू
सर विवियन रिचर्ड्स
डेसमंड हेन्स
सचिन तेंडुलकर
विराट कोहली*
महत्वाच्या बातम्या-
शुबमनसोबत ‘ते’ गलिच्छ कृत्य करताना विराट कॅमेऱ्यात कैद, पाहून नेटकरीही म्हणाले, ‘लाज वाटते तुझी’
निर्णायक स्थितीत थर्ड अंपायरचा वादग्रस्त निर्णय! गिलला आऊट देताच 140 कोटी भारतीय म्हणाले, ‘चुकीचा निर्णय’