लंडन। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी इंग्लंडने आज(15 सप्टेंबर) 399 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ 23 धावांवर बाद झाला.
त्याला इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. तसेच स्मिथचा झेल बेन स्टोक्सने घेतला. स्मिथ आज 23 धावांवर बाद झाला असला तरी त्याने एक खास विक्रम केला आहे.
स्मिथ या ऍशेस मालिकेत पहिल्यांदाच 50 धावा करण्याआधी बाद झाला आहे. त्याने आत्तापर्यंत या ऍशेस मालिकेत 7 डावात अनुक्रमे 144, 142, 92, 211, 82, 80, 23 अशा 110.57 च्या सरासरीने 774 धावा केल्या आहेत. त्यामुळे एका ऍशेस मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्मिथ पाचव्या क्रमांकावर आला आहे.
त्याने इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ऍलिस्टर कूकने 2010-11च्या ऍशेस मालिकेत केलेल्या 766 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
सध्या द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात त्यांच्या 6 विकेट्स 200 धावांवर गमावल्या आहेत. तसेच सध्या मॅथ्यू वेडने अर्धशतक केले असून तो नाबाद खेळत आहे.
एका ऍशेस मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
974 – डॉन ब्रॅडमन, 1930
905 – वॉली हॅमंड, 1928/29
839 – मार्क टेलर, 1989
810 – डॉन ब्रॅडमन, 1936/37
774 – स्टिव्ह स्मिथ, 2019
766 – ऍलिस्टर कूक, 2010/11
महत्त्वाच्या बातम्या –
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारत-दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी२० सामना रद्द..
–११ धावांवर बाद होत वॉर्नरने मोडला ६१ वर्षांपूर्वीचा नकोसा विक्रम
–…म्हणून चहल, कुलदीपला मिळाली नाही भारताच्या टी२० संघात संधी, विराटने केला खूलासा