---Advertisement---

कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 5:00 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी (१९ जानेवारी) ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात वाईट झाली. परंतु युवा फलंदाज शुबमन गिल, कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांच्या खेळीने भारताचा डाव सावरला. परंतु हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर भारतीय संघाला डाव गडगडला. मात्र यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने शेवटपर्यंत चिवट झुंज देत ऑस्ट्रेलियाचे ३२८ धावांचे आव्हान पूर्ण केले आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

अशाप्रकारे सामन्याच्या पाचव्या दिवशी ३०० पेक्षा जास्त धावा करत पाहुण्या भारतीय संघाने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

झाले असे की, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने २९४ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीची भर पडत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान मिळाले. प्रत्युत्तरात भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानावर उतरले. परंतु, पावसाच्या व्यत्ययामुळे संघाच्या अवघ्या ४ धावांवर चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

त्यामुळे सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताला ३२४ धावांचा गड चढायचा होता. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजांचा सामना करताना शुबमन गिल (९१ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (५६ धावा) यांनी अर्धशतके केली. तर शेवटी रिषभ पंतच्या ८९ धावांच्या आतिशी खेळीच्या साहाय्याने भारताने ३२५ धावा केल्या. यासह कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यां संघांच्या यादीत भारताने तिसरा क्रमांक मिळवला आहे.

भारतीय संघापुर्वी सन १९८४ मध्ये वेस्ट इंडिज आणि सन १९४८ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने हा पराक्रम केला होता. वेस्ट इंडिजने लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ३४४ धावा करत सामना जिंकला होता. तर ऑस्ट्रेलियाने १९४८ साली लिड्स येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक ४०४ धावा सामन्यात विजयी पताका झळकावली होती.

कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी सर्वाधिक धावा करणारे संघ –
४०४ धावा- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (लिड्स, वर्ष १९४८)
३४४ धावा- वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (लॉर्ड्स, वर्ष १९८४)
३२५ धावा- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (द गॅबा, वर्ष २०२१)

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

आख्खं मार्केट आता आपलंय.! ऐतिहासिक विजयानंतर भारतासाठी आनंदाची बातमी; टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---