रविवारी पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने अर्धशतक करून चेन्नईला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला.
त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी केली आहे.त्यामुळे या यादीत हे दोघे 184 षटकारांसह विभागून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
रैनाने रविवारी झालेल्या सामन्यात 48 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत आक्रमक फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे.त्याच्या पाठोपाठ एबी डेविलियर्स आणि एमएस धोनी दुसऱ्या स्थानी विभागून आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
ख्रिस गेल: 292 षटकार
एबी डेविलियर्स/ एमएस धोनी:186 षटकार
सुरेश रैना/रोहित शर्मा: 184 षटकार
महत्त्वाच्या बातम्या-
–टाॅप ७- या खेळाडूंनी केल्या आहेत आयपीएलमध्ये ४००० धावा
–फक्त या कारणामुळे झाला मुंबई इंडियन्सचा पराभव?
–धोनीच आहे आयपीएलमधील सर्वात हुशार विद्यार्थी, सर्व परीक्षेत १०० पैकी १०० गुण
–एका मुंबईकराने दुसऱ्याला पराभूत करत तिसऱ्या मुंबईकरासाठी खुली केली प्ले-आॅफची दारं
–सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !