भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) पाहुणा संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला. आफ्रिकेने भारताला 49 धावांनी पराभूत करत मालिकेतील आपली प्रतिष्ठा राखली. मात्र, भारताने ही मालिका 2-1ने खिशात घातली. या सामन्यानंतर आफ्रिकेच्या रायली रूसो याला सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आले. दुसरीकडे, या मालिकेत दमदार कामगिरी केल्यामुळे सूर्यकुमार यादव याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यासोबतच सूर्यकुमार भारतीय संघासाठी सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार पटकावणारा तिसरा खेळाडू ठरला. त्याने रोहित शर्मा आणि युझवेंद्र चहल यांची बरोबरी केली.
सूर्यकुमार यादवची मालिकेतील कामगिरी
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने 28 सप्टेंबर रोजी खेळण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याने 33 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांचा पाऊस पाडत नाबाद 50 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. यानंतर त्याने 2 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टी20 सामन्यात अवघ्या 22 चेंडूत 61 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारला फार चांगली खेळी करता आली नाही. त्याने 6 चेंडूंचा सामना करताना 1 षटकाराच्या मदतीने फक्त 8 धावा केल्या. अशाप्रकारे त्याने एकूण 3 सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीने 119 धावा केल्या आणि मालिकावीराचा पुरस्कार आपल्या शिरपेचात रोवला.
https://twitter.com/BCCI/status/1577353141099827200
सर्वाधिक टी20 मालिकावीर पुरस्कार जिंकणारा तिसरा भारतीय
या टी20 मालिकेसाठी केलेल्या अफलातून कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्याने आतापर्यंत 2 वेळा जिंकला आहे. या यादीत अव्वलस्थानी विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने आतापर्यंत 7 वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे. त्याच्यानंतर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने 3 वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला आहे. त्यानंतर सूर्यकुमार याने 2 मालिकावीर पुरस्कारांसह रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांची बरोबरी केली आहे. हे तिन्ही खेळाडू संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहेत.
टी20त सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू
7 वेळा- विराट कोहली
3 वेळा- भुवनेश्वर कुमार
2 वेळा- सूर्यकुमार यादव*
2 वेळा- रोहित शर्मा
2 वेळा- युझवेंद्र चहल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20त आव्हानाचा पाठलाग करताना घरच्या मैदानावर पाचव्यांदा झालीय टीम इंडियाची गाडी पंक्चर, पाहा आकडेवारी
षटकारांचा पाऊस पाडत दक्षिण आफ्रिकेने भारतभूमीवर रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला पहिला संघ





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा