द ओव्हल | भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या दिवस अखेर 7 बाद 198 धावा केल्या आहेत. हा सामना इंग्लंडचा दिग्गज खेळाडू अॅलस्टर कूकचा शेवटचा सामना आहे.
कूकने कसोटी कारकिर्दीत एकुण 161 सामने खेळले आहेत. त्यातील तब्बल 30 सामने त्याने भारताविरुद्ध खेळले आहे. म्हणजेच तब्बल 18.66% सामने तो भारताविरुद्ध खेळला आहे.
तसेच 12325 कसोटी धावांपैकी 2284 धावा भारताविरुद्ध केल्या आहेत. याची टक्केवारीही 18.53 आहे.
कूक याचबरोबर भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅटींगचा विक्रम मोडला आहे. पाॅटींगने भारताविरुद्ध 29 कसोटी सामने खेळले होते.
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू-
30- अॅलस्टर कूक
29- रिकी पाॅटींग
28- क्लाइव्ह लॉयड
28- जावेद मियादाॅंद
28- सर विव्ह रिचर्ड्स
27- जेम्स अॅंडरसन
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एबी डिविलियर्स खेळणार पाकिस्तान सुपर लीगमध्ये!
–का झाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगी सारासाठी भावूक?
–इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद