लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताने 6 बाद 174 धावा केल्या आहेत.
तसेच इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला बाद केले आहे.
याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे. तो आता भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने हा पराक्रम करताना श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला आहे.
अँडरसनने भारताविरुद्ध 27 व्या कसोटी सामन्यात खेळताना 51 डावात 107 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हा सामना सुरु असल्याने त्याला भारताविरुद्ध आणखी विकेट्स घेण्याची संधी आहे.
भारताविरुद्ध अँडरसनने घेतलेल्या 107 विकेट्सपैकी 26 विकेट्स त्याने भारतात तर 81 विकेट्स त्याने इंग्लंडमध्ये खेळताना घेतल्या आहेत.
याआधी भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर होता मुरलीधरनने 22 सामन्यातील 32 डावात खेळताना 105 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज इम्रान खान आहेत. त्यांनी 23 सामन्यात 38 डावात खेळताना 94 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज-
107 – जेम्स अँडरसन
105 – मुरलीधरन
94 – इम्रान खान
76 – मालकॉम मार्शल
69 – स्टुअर्ट ब्रॉड#म #मराठी @Maha_Sports @MarathiRT @MarathiBrain— Pranali Kodre (@Pranali_k18) September 8, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा केएल राहुल एकमेव क्षेत्ररक्षक
–Video: अक्षर पटेलला विकेट घेण्यात चक्क हेल्मेटने केली मदत!
–Video: मैदानावर ठेका धरणाऱ्या शिखर धवनने भज्जीलाही केले भांगडा करण्यास प्रोत्साहित