---Advertisement---

‘किंग’ कोहलीने या दिग्गजाचा विक्रम तर मोडलाच पण पॉटिंगचाही विक्रम आहे धोक्यात

On: मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019 2:20 PM
---Advertisement---

रांची। आज(22 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला.

भारताचा कर्णधार विराट कोहलीचा हा कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीतील 7 वा विजय ठरला आहे.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या यादीत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार लिंडसे हॅसेट यांना मागे टाकले आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिके विरुद्ध कर्णधार म्हणून 6 सामने जिंकले आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉटिंग असून त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत नेतृत्व करताना 8 सामने जिंकले आहेत.

भारताने आज रांची कसोटी जिंकण्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने विजय मिळवला आहे आणि दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे कर्णधार – 

8 विजय – रिकी पॉटिंग

7 विजय – विराट कोहली

6 विजय – लिंडसे हॅसेट

5 विजय – बिल वूडफुल, पीटर मे, स्टिव्ह वॉ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---