मंगळवारी (२९ सप्टेंबर) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीला १६३ धावांचे आव्हान दिले होते. ह्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १४७ धावाच करु शकला. त्यामुळे हैदराबादने या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयात राशिद खानचे योगदान महत्त्वाचे ठरले.
त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
राशिदची आयपीएलमध्ये ४ षटकात २० किंवा त्यापेक्षा कमी धावा देण्याची ही १५ वी वेळ होती. त्याने २०१७ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून म्हणजेच २०१७ च्या आयपीएल मोसमापासून तो सर्वाधिकवेळा एका सामन्यात ४ षटके गोलंदाजी केल्यानंतर २० किंवा त्यापेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज आहे.
२०१७ पासून सर्वाधिकवेळा ४ षटके गोलंदाजी केल्यानंतर २० किंवा त्यापेक्षा कमी धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत राशिद पाठोपाठ सुनील नारायण असून त्याने ८ वेळा अशी कामगिरी केली आहे. तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी ७ वेळा अशी कामगिरी केली आहे. हे दोघेही संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
२०१७ आयपीएल हंगामापासून ४ षटके गोलंदाजी केल्यानंतर सर्वाधिकवेळा २० किंवा त्यापेक्षा कमी धावा देणारे गोलंदाज –
१५ – राशिद खान
८ – सुनील नारायण
७ – रविंद्र जडेजा
७ – अक्षर पटेल
६ – दीपक चाहर
६ – अमित मिश्रा
महत्त्वाच्या बातम्या –
११ सामन्यानंतर आयपीएल२०२०चा असा आहे पॉईंट टेबल
दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर विलियम्सन, रशीद नाही तर ‘या’ भारतीयाचे डेविड वॉर्नरने केले कौतुक
धोनीशी तुलना नकोच! खासदार शशी थरूर यांच्या प्रतिक्रियेवर संजूचं रोखठोक मत
ट्रेंडिंग लेख –
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
सुपर ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या बेंगलोर संघाने जिंकलेत ‘हे’ २ सामने
भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळी करणारे ३ क्रिकेटर्स






