---Advertisement---

बुमराहचे पुनरागमन म्हणजे विक्रम तर होणारच!

On: बुधवार, जानेवारी 8, 2020 11:33 AM
---Advertisement---

इंदोर। काल (7 जानेवारी) भारताने श्रीलंकेविरुद्ध होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी खास ठरला.

त्याने या सामन्यामधून दुखापतीतून सावरल्यावर अनेक महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. हे पुनरागमन करतानाच त्याने एक खास विक्रमही केला. त्याने काल श्रीलंकेच्या दसून शनकाची विकेट घेतली. बुमराहची ही आंतरराष्ट्रीय टी20मधील 52 वी विकेट ठरली आहे. त्याने या 52 विकेट्स 44 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात घेतल्या आहेत.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल क्रमांकावर असणाऱ्या आर अश्विन आणि युजवेंद्र चहलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

अश्विनने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 46 सामन्यात 52 विकेट्स घेतल्या आहेत, तर चहलनेही 36 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 52 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स केवळ अश्विन, चहल आणि बुमराह या तिघांनाच आत्तापर्यंत घेता आल्या आहेत.

-आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

52 विकेट्स – युजवेंद्र चहल (36 सामने)

52 विकेट्स – आर अश्विन (46 सामने)

52 विकेट्स – जसप्रीत बुमराह (44 सामने)

41 विकेट्स – भुवनेश्वर कुमार (43 सामने)

39 विकेट्स – कुलदीप यादव (21 सामने)

38 विकेट्स – हार्दिक पंड्या (40 सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---