IND vs BAN Chennai Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 3 गडी बाद 81 धावा इतकी आहे. भारतीय संघ 308 धावांनी आघाडीवर आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माशिवाय यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोठा विक्रम घडला आहे.
खरे तर, आतापर्यंत चेपॉकमध्ये गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. चेपॉकची खेळपट्टी दोन्ही संघांच्या गोलंदाजांसाठी पोषक ठरत आहे. या खेळपट्टीवर फलंदाज हतबल आणि असहाय दिसत आहेत. भारतीय संघानंतर दोन सत्रात बांगलादेशचा संघही सर्वबाद झाला. यामुळे कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम घडला आहे.
चेपॉकमध्ये आज एक मोठा विक्रम झाला
आज चेन्नई कसोटीचा दुसरा दिवस गोलंदाजांच्या नावावर होता. चेपॉक कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे एकूण 17 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले, हा एक विक्रम आहे. यापूर्वी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी सर्वाधिक विकेट 45 वर्षांपूर्वी पडल्या होत्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चेपॉक येथे 1979 मध्ये कसोटी खेळली गेली होती. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एकूण 15 फलंदाज बाद झाले होते. अशाप्रकारे आज चेपॉकमध्ये एका दिवसात सर्वाधिक फलंदाज बाद होण्याचा विक्रम झाला आहे.
चेन्नई कसोटीवर भारतीय संघाची पकड घट्ट
आज भारताच्या पहिल्या डावातील उर्वरित 4 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर बांगलादेशचे 10 खेळाडू बाद झाले. त्याचबरोबर भारतीय संघाचे 3 फलंदाज दुसऱ्या डावात बाद झाले आहेत. अशाप्रकारे चेपॉक कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे एकूण 17 फलंदाज बाद झाले.
दरम्यान, चेन्नई कसोटीबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 3 बाद 81 अशी आहे. भारतीय संघाची आघाडी 308 धावांवर पोहोचली आहे. सध्या भारताकडून रिषभ पंत आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहली नॉट आऊट होता, तरीही रिव्ह्यू घेतला नाही; कर्णधार-अंपायर सगळेच हैराण
IND vs BAN: बांगलादेशविरूद्धच्या दोन्ही डावात कर्णधार रोहित शर्मा फ्लाॅप!
चेन्नई कसोटीवर भारताची मजबूत पकड, दुसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावे