भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची गणना जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये होते. त्याच्या धावा बनवण्याच्या गतीमुळे त्याला ‘रनमशीन’ या नावानेही ओळखले जाते. मात्र, विराट फक्त बॅटमधूनच नाही, तर क्षेत्ररक्षण करूनही आपल्या नावावर विक्रम करताना दिसत आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत खेळल्या जात असलेल्या पाचव्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास पराक्रम गाजवला. अशी कामगिरी आजपर्यंत भारताच्या कुठल्याच खेळाडूला जमली नव्हती.
विराट कोहलीने काय केला विक्रम?
झाले असे की, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श उतरले होते. मात्र, मिचेल मार्श हा जसप्रीत बुमराह टाकत असलेल्या तिसऱ्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. यावेळी त्याला स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहली याने झेलबाद केले. विराटने हा झेल घेताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
https://twitter.com/Mufaddal_Vohre/status/1710942842804109425
History.
Virat Kohli has the most catches as a fielder for India in World Cups. pic.twitter.com/OTHNcnaqDl
— Johns. (@CricCrazyJohns) October 8, 2023
विराट कोहली विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला. विराटने विश्वचषकात पकडलेला 15वा झेल होता. याबाबतीत त्याने अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले. कुंबळेने 14 वेळा, तर सचिन आणि कपिल देव यांनी विश्वचषकात प्रत्येकी 12 वेळा झेल घेतला होता.
पुरुषांच्या वनडे विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारे भारतीय खेळाडू
15 – विराट कोहली*
14 – अनिल कुंबळे
12 – सचिन तेंडुलकर
12 – कपिल देव
Most World Cup catches by Indian fielders (men's ODI):
15* – VIRAT KOHLI
14 – Anil Kumble
12 – Sachin Tendulkar
12 – Kapil Dev#CWC2023 #INDvAUSpic.twitter.com/4AMl7WQyFX— Kausthub Gudipati (@kaustats) October 8, 2023
वनडेत विराट कोहलीची क्षेत्ररणाची कामगिरी
विराट कोहली याच्या वनडे क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाची कामगिरी पाहायची झाली, तर त्याने आतापर्यंत 282 वनडे सामन्यातील 279 डावात क्षेत्ररक्षण करताना तब्बल 146 झेल घेतले आहेत. भारताकडून यष्टीरक्षण न करता सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानी आहे. यादीतील अव्वलस्थान मोहम्मद अझरुद्दीन याच्याकडे आहे. त्याने कारकीर्दीत 156 झेल घेतले आहेत. (Most World Cup catches by Indian fielders in men’s ODI see list)
हेही वाचा-
आजपर्यंत जो विक्रम सचिन-डिविलियर्सच्या नावावर होता, तो वॉर्नरने टाकला मोडून; बनला यादीतील टॉपर
IND vs AUSच्या वर्ल्डकप अभियानाला सुरुवात! टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, पाहा तगडी प्लेइंग XI