महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 स्पर्धेत गुरुवारी (21 जून) पहिला सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स (सीएसके) असा खेळला गेला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या या सामन्यात कोल्हापूर संघाने आठ गडी राखून विजय मिळवत, प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. तर, सलग चौथ्या पराभवामुळे छत्रपती संभाजी किंग्स संघाचे आव्हान संपुष्टात आले. कोल्हापूर संघासाठी चार बळी मिळवणारा फिरकीपटू श्रेयस चव्हाण सामनावीर ठरला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून छत्रपती संभाजी किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. कोल्हापूरच्या आत्मन पोरेने संभाजी किंग्जच्या सौरभ नवलेला पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद केले. तर दुसऱ्या षटकात निहाल तुसमदने ओंकार खाटपेला झेल बाद करून संघाला दुसरा झटका दिला. मुर्तझा ट्रंकवालाने एकाबाजूने लढताना 36 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. त्यानंतर ओम भोसलेच्या 22 धावा, आनंद ठेंगेच्या 18 वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. कोल्हापूरच्या श्रेयस चव्हाण(4-20), अक्षय दरेकर(2-12), सिद्धार्थ दरेकर(2-8), निहाल तुसमद(1-4), आत्मन पोरे (1-25) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा डाव 19.4 षटकात 101 धावांवर संपुष्टात आला.
101 धावांचे आव्हान कोल्हापूर टस्कर्स संघाने सलामीवीर केदार जाधव(15 धावा) व अंकित बावणे(37 धावा) या जोडीने 260चेंडूत 32 धावांची भागीदारी केली. केदार जाधवला हितेश वाळुंजने दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या व स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या नौशाद शेखने 24 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या. नौशाद व अंकित यांनी दुसऱ्या गड्यासाठी 35 चेंडूत 41 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. अंकितला तनिश जैनने त्रिफळा बाद केले. त्यानंतर नौशाद शेख व साहिल औताडे(नाबाद 28 धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 23 चेंडूत 29 धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी श्रेयस चव्हाण ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
छत्रपती संभाजी किंग्ज: 19.4 षटकात सर्वबाद 101 धावा(मुर्तझा ट्रंकवाला 32(36,2×4,16), ओम भोसले 22, आनंद ठेंगे 18, श्रेयस चव्हाण 4-20, अक्षय दरेकर 1-12, सिद्धार्थ दरेकर 2-8, निहाल तुसमद 1-4, आत्मन पोरे 1-25) पराभुत वि.कोल्हापूर टस्कर्स:14षटकात 2 बाद 102 धावा(अंकित बावणे 37(33,5×4,1×6), नौशाद शेख नाबाद 28(24,3×4), साहिल औताडे नाबाद 22(15,1×4,2×6), केदार जाधव 15, हितेश वाळुंज 1-22, तनिश जैन 1-22); सामनावीर -श्रेयस चव्हाण; कोल्हापूर टस्कर्स संघ 8 गडी राखून विजयी.
(MPL 2023 Kolhapur Tuskers Beat Chhatrapati Sambhaji Kings By 8 Wickets Entered In Playoffs)
महत्वाच्या बातम्या-
सोलापूरविरूद्ध पुणेरी बाप्पाचे टार्गेट प्ले ऑफ्स! ‘या’ चौकडीकडून आहेत अपेक्षा
IPLमध्ये फ्लॉप, पण T20 ब्लास्टमध्ये सुपरहिट, करनने 18 चेंडूत ठोकली फिफ्टी; पाहा 63 सेकंदाचा व्हिडिओ