पुण्यातील एमपीएल स्टेडियवर गुरुवारी (29 जून) महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना वेळेत सुरू झाला नाही. रात्री 11 वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही आणि आयोजिकांना हा सामना राखीव दिवशी म्हणजे शुक्रवारी पुन्हा आयोजित करावा लागाला. मैदानात मोठ्या संखेत उपस्थित असणाऱ्या चाहत्यांचीही चांगलीच निराशा झाला.
रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स संघ एमपीएलच्या या अंतिम सामन्यात आमने सामने आहेत. गुरुवारी यांच्यातील लढत पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुणे येथे प्रेक्षकांनी मोठ्या संखेत उपस्थिती दर्शवली होती. मात्र, पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. 11 वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतर आयोजिकांनी हा सामना शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल, अशी माहिती दिली.
मागच्या काही दिवसांपासून पुण्यासह महाराष्ट्रात पावसाच्या सरी सुरूच आहेत. एमपीएला देखील पावसामुळे आपले सामने रद्द होऊ शकतात याची कल्पना होती. याच पार्श्वभूमीवर एमपीएलने प्लेऑफच्या चार सामन्यांसाठी नवीन नियमावली घोषित केली होती. या नियमांनुसार पावसामुळे सामन्याला उशीर झाला, तर किमान 5 षटकांचा सामना खेळवला जाणार होता. तसेच सुपर ओव्हरवर देखील सामना निकाली काढला जाऊ शकत होता. मात्र, गुरुवारी मैदानातील पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. तसेच सपोर्ट स्टाफसाठीही खेळपट्टी खेळण्यालायक बनवणे सोपे नव्हते.
अशात गुरुवारचा हा अंतिम सामना राखीव दिवशी म्हणजेच शुक्रवारी (30 जून) आयोजित केला जाणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता सामना खेळला जाईल, असे सांगितले गेले आहे. मात्र, शुक्रवारी देखील पावसामुळे सामन्याला उशीर होऊ शकतो. (MPL 2023 Thursday’s MPL final will be played on Friday due to rain)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
ऍशेस ट्रॉफी जिंकणे ऑस्ट्रेलियासाठी आता कठीण! लॉर्ड्सवर प्रमुख खेळाडूला दुखापत
‘मी दिनेश कार्तिकला मनात नाही तसलं बोललो…’, भारत-पाक सामन्याबाबत अश्विनचा धक्कादायक खुलासा