इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यासाठी २ आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. यात अनेक संघांनी यूएईला आधीच हजेरी लावली आहे. त्यातच आता विविध देशातील अनेक खेळाडू देखील आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईला रवाना होत आहेत. याबाबत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) ताफ्यातून एक बातमी समोर आली आहे.
आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स यूएईला रवाना झाला आहे. याबाबत आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी माहिती दिली. हेसन म्हणाले, “एबी डिव्हिलियर्स आता संघात सहभागी झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल देखील पुढील २ किंवा ३ दिवसात यूएईला पोहोचेल.”
तसेच आरसीबीसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिनसन देखील आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध असणार आहे. यावर हेसन म्हणाले, “जेमिनसन आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. जेमिनसन १० सप्टेंबरला यूएईमध्ये पोहोचणार आहे.”
Our excitement levels just went 📈📈📈@ABdeVilliers17 has joined the team. 😎#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #ABHasArrived pic.twitter.com/VqOSalCdHZ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 6, 2021
तसेच आरसीबीच्या कॅम्पमधून आणखी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आरसीबीचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमधून आल्यावर सरळ संघात सामील होणार आहे. त्याला विलीगीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही. तसेच श्रीलंकेच्या खेळाडूंबाबतही संघाने एक महत्वपूर्ण माहिती दिली.
याबाबत आरसीबीकडून सांगण्यात आले की, “विराट कोहली आणि श्रीलंकाचे खेळाडू यांना एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये सरळ प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये त्यांना विलीगीकरणाची गरज नाही. त्यामुळे विराटसह हे खेळाडू सरळ मैदानात उतरणार”
आयपीएलच्या १४ व्या हंगामात भारतात झालेल्या आत्तापर्यंतच्या सामन्यात आरसीबीने चांगले प्रदर्शन केले होते. ज्यामध्ये आरसीबी ७ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही आरसीबीला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याची चांगली संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–“जर कोणी शार्दुल ठाकूरचा फॅन क्लब काढला, तर मला त्याचा पहिला सदस्य बनयला आवडेल”
–“वी आर चेन्नई बॉईज”, ब्रावो-डू प्लेसिसने सीएसकेच्या आठवणीत गायले खास गाणे, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
–तीन दिग्गज फलंदाज ज्यांनी आयपीएलमध्ये अनेकदा मोठ्या खेळी केल्या, पण शतक झळकावण्यात आले अपयश