---Advertisement---

दिल्लीने दिला होता डिविलियर्सला धोका? 13 वर्षे जुना किस्सा सांगत ‘मिस्टर 360’ म्हणाला, ‘त्यांनी मला…’

On: शुक्रवार, डिसेंबर 1, 2023 2:48 PM
AB-De-Villiers
---Advertisement---

सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये गणला जाणारा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स होय. डिविलियर्स त्याच्या जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखला जायचा. मात्र, एक काळ असाही होता, जेव्हा त्याला तेवढे महत्त्व दिले जात नव्हते. त्यामुळेच आता त्याने आयपीएल स्पर्धेशी संबंधित 13 वर्षे जुना किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितले आहे की, कशाप्रकारे दिल्ली डेअरडेविल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स) संघाने त्याला असे म्हणून रिलीज केले होते की, ते त्याला पुन्हा रिटेन करतील. जवळपास 18 वर्षे क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या एबीडीने 2021मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. तो अखेरचे 11 वर्षे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून आयपीएल खेळला.

काय म्हणाला डिविलियर्स?
‘मिस्टर 360’ नावाने ओळखळ्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने दिल्ली संघाकडून 3 हंगाम खेळल्यानंतर पुढील 11 वर्षे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळला. आता 13 वर्षांनंतर त्याने दिल्ली डेअरडेविल्स (Delhi Daredevils) संघाशी संबंधित एक मोठा दावा केला आहे. त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की, “जेव्हा मी 2010 हंगामात खेळलो होतो, तेव्हा मला ऑफिसात बोलावले गेले. तसेच, सांगितले गेले की, ‘तुला रिटेन केले जाईल, युवा एबी डिविलियर्स.’ मी त्या मीटिंगमध्ये डेविड वॉर्नरसोबत बसलो होतो. एक किंवा 2 आठवड्यांनंतर जेव्हा मला जाणवले की, मला रिलीज केले गेले आहे, तेव्हा ती माझ्यासाठी हैराण करणारी बाब होती. त्यावेळी संवाद तितका चांगला नव्हता. आता ही वेगळी गोष्ट आहे, पण ही एक चांगली गोष्ट नाहीये.”

पुढे बोलताना 39 वर्षीय डिविलियर्स म्हणाला, “तुम्ही तुमच्या कारकीर्दीविषयी अनिश्चित आहात, त्यावेळी 2010मध्ये मला वाटते की, मी त्या आयपीएल हंगामात फक्त 5 सामने खेळलो होतो. त्यामुळे माझ्या मनात खूप जास्त शंका निर्माण झाल्या होत्या. मात्र, माझा आंतरराष्ट्रीय हंगाम खूप चांगला राहिला होता. मी चांगले क्रिकेट खेळत आलो होतो आणि सुदैवाने लिलाव झाला आणि मला आरसीबीने खरेदी केले. याने माझे आयुष्य नेहमीसाठी बदलले. त्यांच्यासोबतच्या खूप चांगल्या आठवणी आहेत.”

डिविलियर्सची कारकीर्द
विशेष म्हणजे, आरसीबीने डिविलियर्सला 2011च्या लिलावात तब्बल 5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तसेच, तो 11 हंगाम आरसीबी (RCB) संघाकडून खेळला. त्याची आयपीएल कारकीर्द पाहिली, तर त्याने एकूण 184 सामन्यात 39.71च्या सरासरीने 5162 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 40 अर्धशतकांचाही समावेश आहे. नाबाद 133 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. (mr 360 ab de villiers revealed i was released by delhi daredevils in 2010 after being told this read more)

हेही वाचा-
नागराज मंजुळेंनी शड्डू ठोकला! बहुचर्चित ‘खाशाबा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं विधान; म्हणाला, ‘मी फक्त रिंकूसाठी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---