पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डेक्कन जिमखाना-पीएमडीटीए मानांकन महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मृणाल शेळके, श्रावी देवरे, काव्या पाटणी, अंजली निंबाळकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मृणाल शेळकेने आपली विजयी मालिका कायम ठेवत स्वरा जावळेचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. चुरशीच्या लढतीत अंजली निंबाळकर हिने आरोही देशमुखवर टायब्रेकमध्ये 5-4(3) असा विजय मिळवला. श्रावी देवरेने वीरा हरपुडेचे आव्हान 5-1- असे सहज मोडीत काढले. आणखी एका अतितटीच्या सामन्यात काव्या पाटणीने अमिशी गर्गचा टायब्रेकमध्ये 5-4(2) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भावना अगरवालने स्नेहा स्वामीच्या साथीत काव्या देशमुख व अंजली निंबाळकर यांचा 5-3 असा तर, रितिका मोरे व श्रावणी देशमुख यांनी आर्या हिरे व तन्वी देवकर या जोडीचा 5-1 असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
निकाल: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी: 14 वर्षांखालील मुली:
मृणाल शेळके वि.वि.स्वरा जावळे 5-0;
श्रावी देवरे वि.वि.वीरा हरपुडे 5-1;
काव्या पाटणी वि.वि.अमिशी गर्ग 5-4(2);
अंजली निंबाळकर वि.वि.आरोही देशमुख 5-4(3);
दुहेरी गट: महिला: उपांत्यपूर्व फेरी:
भावना अगरवाल/स्नेहा स्वामी वि.वि.काव्या देशमुख/अंजली निंबाळकर 5-3;
रितिका मोरे/श्रावणी देशमुख वि.वि.आर्या हिरे/तन्वी देवकर 5-1;
मृणाल शेळके/आरोही देशमुख वि.वि.वीरा हरपुडे/श्रावी देवरे 5-4(2).
महत्त्वाच्या बातम्या
‘विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा त्याला वाटते की तोच राजा आहे’
वॉर्न सचिनच्या घरी गेला पण खाऊ शकला नव्हता चिकन, मग काय स्वत:च बनवली डीश, वाचा किस्सा