---Advertisement---

फिक्सिंग प्रकरणाबाबत कोहली-धोनीबद्दल एसीयू प्रमुखांनी केले मोठे भाष्य, म्हणाले…

On: बुधवार, सप्टेंबर 18, 2019 1:08 PM
---Advertisement---

तमिळनाडू प्रीमीयर लीगमध्ये सध्या मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत. याबद्दलचा तपास बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी समीतीचे अध्यक्ष अजित सिंग करत आहेत.

मॅच फिक्सिंगबद्दल आयएएनएसशी बोलताना अजित सिंग म्हणाले की सट्टेबाज एमएस धोनी, विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूंना संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाही.

ते म्हणाले, ‘जर तूम्ही मला विचाराल तर सध्या क्रिकेटमध्ये अशा प्रकरणात समावेश असेल तर स्टार खेळाडूकडे काहीतरी मिळवण्यापेक्षा गमावण्यासारखे खूप काही असते. कल्पना करा विराट कोहली किंवा एमएस धोनी जर अशा प्रकरणात अडकले तर…’

‘काही गोष्टी फक्त पैशांच्याच नसतात तर प्रतिष्ठेच्या बाबतीतही असतात. ते त्यांची प्रतिष्ठा अशा गोष्टींसाठी पणाला लावू शकत नाही. ते खेळाडू यापेक्षा खूप मोठे आहेत.’

‘जरी तूम्ही अर्थिक दृष्टीने विचार केला तरी असे वाटते का की ते खेळाडू यात सामील असतील. त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेमुळे आणि स्टार पॉवरमुळे मोठे फायदे मिळतात. सट्टेबाजी त्यांना त्या पैशाची थोडी टक्केवारीही देत नाही.’

‘सट्टेबाज त्यांना मिळेल त्या संधीचा शोध घेत असतात. त्यांना जर कोणत्या स्पर्धेमध्ये जाता आले नाही, तर ते स्वत:ची लीग सुरु करतात. ते आता दुसऱ्या देशातही खेळाची प्रसिद्धी करण्याच्या नावाखाली जाऊ लागले आहेत. ते नवीन स्पर्धा अयोजित करतात आणि खेळासाठी काहीतरी करत असल्याचे दाखवतात.’

‘हा देश स्वतंत्र असल्याने कोणालाही कोणतीही स्पर्धा अयोजित करण्यापासून रोखता येत नाही. पण बीसीसीआय हे करु शकते आणि सांगू शकते की ही स्पर्धा मान्यता प्राप्त नाही त्यामुळे बीसीसीआयच्या अंतर्गत खेळाडू तिकडे जाऊ शकत नाही. पण अजूनही काही यूवा खेळाडू यामध्ये खेळतात. काहीवेळेस त्यांना लीगला मोठे करण्यासाठी बाहेरचे खेळाडूही मिळतात.’

पण त्याचबरोबर अजित सिंग यांनी म्हटले आहे की सट्टेबाज भारताबाहेर जात असल्याने बीसीसीआय भ्रष्टाचार रोखण्यात यशस्वी झाल्याचे समजून येत आहे.

तसेच त्यांनी म्हटले आहे की सट्टेबाजी कायदेशीर करायला हवी, तसेच खेळातील भ्रष्टाचाराला गुन्हा ठरविणे आवश्यक आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहली-कागिसो रबाडाबद्दल क्विंटॉन डीकॉकने केले मोठे भाष्य

एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला…

कुटुंबाशी निगडीत वृत्त छापल्याने बेन स्टोक्सने ब्रिटिश वृत्तपत्राला फटकारले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment