---Advertisement---

विमानात ब्लॉग करायला निघालेल्या चाहरला धोनीने दिलं हाकलून? दोनदा झाली ‘हटाई’, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, एप्रिल 8, 2023 3:19 PM
MS-Dhoni-And-Deepak-Chahar
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 12वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यासाठी चेन्नई संघ मुंबईत पोहोचला आहे. तसेच, विमानतळावरील प्रवासादरम्यान चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याच्यावर एक खास जबाबदारी सोपवण्यात आली. ती जबाबदारी अशी होती की, प्रवासादरम्यानचा ब्लॉग बनवणे. यासाठी त्याला संघ सहकाऱ्यांशीही चर्चा करायची होती. आता त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्याची दोनवेळा संघसहकाऱ्यांनी थट्टा उडवली.

यावेळी दीपक चाहर (Deepak Chahar) याला संंघसहकाऱ्यांशी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या रणनीती आणि योजनेविषयी बोलायचे होते. त्याने यावेळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, मुंबईमध्ये खेळायला कसे आवडेल? यावेळी मुंबईसाठी घरगुती क्रिकेट खेळणाऱ्या अजिंक्य रहाणे याने खेळपट्टी आणि उसळीबद्दल चांगली माहिती दिली. मात्र, त्याच्यासोबतच काही खेळाडूंनी चाहरची थट्टा उडवली.

अंबाती रायुडू याच्याशी चाहरने जेव्हा हातमिळवणी केली, तेव्हा तो म्हणाला की, “सुट्टे नाहीयेत.” यासह त्याने त्याला पुढे जाण्यास सांगितले. दुसरीकडे, विमानात एमएस धोनी (MS Dhoni) यानेही चाहरला दुर्लक्षित केले. खरं तर, चाहर जेव्हा कॅमेरा घेऊन धोनीकडे पोहोचला, तेव्हा तो पुस्तक वाचत होता. चाहरने जेव्हा त्याच्याशीसंवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने हाताने इशारा करत त्याला पुढे जाण्यास सांगितले. धोनीने चाहरकडे पाहिलेपण नाही. तो म्हणाला की, “माही भाई उत्तर द्या. कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात तुम्ही?” मात्र, धोनीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्स संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केला आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडत आहे.

चेन्नई संघाची स्पर्धेतील कामगिरी
खरं तर, चेन्नईचा मुंबईविरुद्धचा हा स्पर्धेतील तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईला गुजरातकडून 5 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर लखनऊविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईने 12 धावांनी शानदार विजय मिळवला होता. आता तिसऱ्या सामन्यात चेन्नई संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. (ms dhoni and deepak chahar funny video during csk flight to mumbai see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: मेयर्सची विकेट पडताच हैदराबादच्या मालकिणीचे तुफान सेलिब्रेशन, काव्याच्या अंदाजावर चाहते फिदा

मुंबईशी भिडण्याआधीच सीएसकेला मोठा झटका! अष्टपैलू पायाच्या दुखापतीमुळे माघार घेण्याच्या तयारीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---