महेंद्रसिंग धोनी साठी जुलै महिना खूपच खास आहे. कारण या महिन्यात माजी भारतीय कर्णधार धोनी 7 जुलै रोजी त्याचा वाढदिवस साजरा करतो. आणि या महिन्यातच धोनीच्या लग्नाचा वाढदिवस देखील असतो. तर याचदरम्यान धोनी आज गुरुवार, 4 जुलैला त्याच्या लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी त्यानी पत्नी साक्षीसोबत केक कापला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केक कटिंगदरम्यान धोनी आणि साक्षी अतिशय साध्या लूकमध्ये दिसत आहेत. धोनीने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. यावेळी त्याचा पाळीव कुत्राही दिसत आहे. दोघांनी एकमेकांचा हात धरून केक कापला. सर्वप्रथम माहीने पत्नी साक्षीला केक खाऊ घातला. त्यानंतर साक्षीने धोनीला केक खाऊ घातला. यानंतर भारताच्या माजी कर्णधाराने आपल्या पाळीव कुत्राला देखील केक भरवले.
MS Dhoni & Sakshi celebrating their 15th wedding anniversary ❤️ pic.twitter.com/Et5JuBx0Jt
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
वृत्त अहवलावर विश्वास ठेवला तर एमएस धोनी आणि साक्षी लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांचे दोन्ही वडील रांचीच्या मेकॉन कंपनीत काम करत होते. दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते. मात्र त्यानंतर दोघेही वेगळे झाले. साक्षीचे कुटुंब डेहराडूनला शिफ्ट झाले. एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर दोघांमधील सर्व संपर्क तुटला.
तथापि, नशिबात काहीतरी वेगळेच होते. जवळपास 10 वर्षांनंतर कोलकाता येथे दोघे पुन्हा भेटले. ही भेट 2007 मध्ये झाली होती, त्यानंतर दोघांनी पुन्हा बोलणे सुरू केले आणि डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर धोनी आणि साक्षीने 2010 मध्ये लग्न केले.
महत्तवाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदींनी वर्ल्डकप ट्रॉफी हातात न घेता रोहित-द्रविडचा हात का धरला? जाणून घ्या
टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांची अलोट गर्दी, तर कांगारुंना कोणीच विचारलं नव्हतं
अभिमानाचा क्षण! मुख्यमंत्र्यांचं खास आमंत्रण, रोहित शर्मासह या खेळाडूंना विधानसभेत भेटीसाठी बोलावलं