---Advertisement---

जेव्हा भेटले दोन ‘खिलाडी’…! सोशल मीडियावर व्हायरल होतोय एमएस धोनी आणि अक्षय कुमारचा फोटो

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 5:08 PM
MS-Dhoni-Akshay-Kumar
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) हा सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसतो. मात्र सतत सोशल मीडियावर त्याची चर्चा होत असते. नुकताच धोनी आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. धोनीचा बालपणीचा मित्र सीमंत लोहानी याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत धोनी आणि अक्षयबरोबर सीमंतही दिसत आहे. 

फोटोमध्ये खराखुरा खेळाडू अर्थातच धोनी गल्फच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षयने कंपनीची जर्सी घातलेली आहे. सीमंतने धोनी आणि अक्षयचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘गल्फ शूटदरम्यान अक्षय कुमारसोबत कॅचअप’.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून असे म्हटले जात आहे की, हे दोन्ही खिलाडी जाहिरातीचे शूट करण्यासाठी एकत्र आले आहेत.

https://www.instagram.com/p/CaUzXAZBbs8/?utm_source=ig_web_copy_link

धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. वर्ष २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याच्या नेतृत्त्वाखाली ट्रॉफी जिंकली होती. यानंतर आता आयपीएल २०२२ मध्ये तो पुन्हा एकदा चेन्नई संघाची कमान सांभाळेल. या हंगामासाठी चेन्नई संघाने धोनीसहित रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांना रिटेन केले आहे. जडेजासाठी संघाने सर्वाधिक १६ कोटी रूपये खर्च केले आहेत. तर धोनीला १२ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. मोईन अलीला ८ कोटी आणि ऋतुराजला ६ कोटींना संघात कायम ठेवले गेले आहे.

याव्यतिरिक्त चेन्नईने मेगा लिलावात वेगवान गोलंदाज दीपक चाहरवर १४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तो यंदाच्या लिलावात सर्वाधिक किंमतीला विकला गेलेला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग –
उर्वरित किंमत – २ कोटी ९५ लाख
संघातील खेळाडू – २५ (परदेशी ८)
संघ – रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉनवे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोळंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितबरोबर केएल राहुल नाही, तर ‘या’ खेळाडूने करावी कसोटीत ओपनिंग, दिग्गजाचा सल्ला

‘या’ खेळाडूंनी करावी ओपनिंग, तर रोहितने तिसऱ्या क्रमांकावर लढवावा किल्ला; पाहा कोण म्हणतंय

पंजाब किंग्समध्ये मयंक घेणार केएल राहुलची जागा? फ्रँचायझी मोठी जबाबदारी सोपण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---