---Advertisement---

कोहली ऍंड ऍडलेड कनेक्शन! विराटबाबत धोनीचा जुना व्हिडिओ का होतोयं व्हायरल?

On: गुरूवार, नोव्हेंबर 3, 2022 1:45 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज विराट कोहली याचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड पाहिला तर आकडेवारी जबरदस्त आहे. मग तो क्रिकेट प्रकार कोणताही असो, तो भन्नाट कामगिरी करतोच. त्याचाच प्रत्यय बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आला. टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12चा 35वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळला गेला. हा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार केवळ 5 धावांनी जिंकला. यामध्ये विराटने नाबाद 64 धावा केल्या.

बांगलादेशविरुद्धचा सामना ऍडलेडच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. सामना जिंकताच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा एका जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ज्यामध्ये धोनीने विराट कोहली (Virat Kohli) याच्या खेळीचे कौतुक करताना महत्वाचे विधान केले आहे. त्यामध्ये धोनी हसताना म्हणाला, “मला वाटते की ऍडलेडमध्ये कोहलीचा स्टॅंड बनवत आहे. जो जसजसा धावांचा डोंगर रचत चालला त्यावरून तो जोपर्यंत त्याची कारकिर्द संपेल तोपर्यंत तो ऑस्ट्रेलियाच्या अनेक मैदानावर आपल्या नावाचा स्टॅंड उभारेल.”

https://twitter.com/Semperfiunited/status/1587738892609810432?s=20&t=D3ZCQ7hklZnbkzM706G-Lg

विराट कोहली ऍंड ऍडलेड कनेक्शन
विराटसाठी ऍडलेड ओव्हल मैदान नेहमीच खास राहिले आहे. त्याने कसोटीतील पहिले शतक याच मैदानावर केले होते. 2012मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 116 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर दोन वर्षानंतर कर्णधार म्हणून पदार्पण केल्यावर याच मैदानावर एकाच कसोटी सामन्यात 115 आणि 141 अशा खेळी केल्या होत्या.

बांगलादेशचा सामना जिंकल्यावर विराट म्हणाला, “मला या मैदानावर खेळताना घरच्या मैदानावर खेळल्याचा भास होता. नेटपासून ते मुख्य सामन्यापर्यंत फलंदाजी करताना घरच्यासारखे वाटते. मेलबर्नमध्ये खेळलेली खेळी महत्वपूर्ण होतीच, मात्र ऍडलेडवर एका वेगळ्याच प्रकारची भावना होते आणि फलंदाजी करताना त्याचा आनंद घेतो.”

https://www.instagram.com/reel/CkdlWJvLM8z/?utm_source=ig_web_copy_link

विराटने या मैदानावर तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मिळून आतापर्यंत 14 डाव खेळले. त्यामध्ये त्याने 5 शतके आणि 5 अर्धशतकांसह 907 धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: शेवटचे षटक… चौकार-षटकार आणि अर्शदीप सिंगचे ‘एरोप्लेन सेलिब्रेशन’
VIDEO: पराभवानंतर बांगलादेशची रडारड! विराटवरच लावला ‘फेक फिल्डींग’चा आरोप; म्हणाले, ‘त्या 5 धावा…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---