शुक्रवारपासून (31 मार्च) अहमदाबाद येथे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. 16व्या हंगामाच्या उद्घाटनाचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सायंकाळी 7.30 वाजता हा सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी गुजरात विरुद्ध चेन्नई संघात 2 सामने खेळले गेले होते. अशात आपण गुजरात विरुद्ध चेन्नई संघाची आमने-सामने कामगिरी जाणून घेऊयात.
विशेष म्हणजे, गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघ तिसऱ्यांदा आमने-सामने असतील. मागील दोन्ही सामने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने जिंकले होते. आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. एमएस धोनी (MS Dhoni) याचा संघ हा सामना जिंकून शानदार प्रदर्शन करेल, तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरातच्या नजरा 3-0ने आघाडी घेण्यावर असेल.
मागील दोन्ही सामन्यात चेन्नईचा पराभव
खरं तर, पुण्यात आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील 29व्या सामन्यात पहिल्यांदा गुजरात विरुद्ध चेन्नई (Gujarat vs Chennai) संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात पंड्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व राशिद खान याने केले होते. यावेळी राशिदने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 169 धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाड याने या सामन्यात 73 आणि अंबाती रायुडू याने 46 धावांची खेळी साकारली होती.
गुजरातने मिळवलेला विजय
चेन्नईच्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात एकेवेळी 4 विकेट्स गमावत 48 धावांवर खेळत होता. यानंतर डेविड मिलर आणि कर्णधार राशिद खान यांनी वादळी फलंदाजी करत 1 चेंडू शिल्लक ठेवून संघाला विजय मिळवून दिला. मिलरने 51 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या होत्या. तसेच, राशिदने 21 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 133 धावा केल्या होत्या. यावेळी ऋतुराजने पुन्हा अर्धशतक केले होते. तसेच, गुजरातने आव्हानाचा पाठलाग करताना 7 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात वृद्धिमान साहा याने 67 धावा केल्या होत्या. आता आगामी हंगामात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ms dhoni csk vs hardik pandya gt head to head gujarat titans beat chennai super kings two times in ipl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिकव्हर होत असलेल्या पंतबाबत मोठी बातमी! IPL 2023 सुरू होण्यापूर्वीच म्हणाला, ‘मी खेळायला येतोय…’
धोनीच्या नेतृत्वावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्मिथही फिदा; म्हणाला, ‘ही’ कला त्याच्याकडून शिकलोय