---Advertisement---

भर मैदानात अंपयारशी वाद एमएस धोनीला पडला महागात…

On: शुक्रवार, एप्रिल 12, 2019 2:28 PM
---Advertisement---

जयपूर। गुरुवारी(11 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 25 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने 4 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने मैदानावर येत पंचाबरोबर वाद घातल्याने त्याला 50 टक्के मॅच फीचा दंड करण्यात आला आहे.

या प्रकरणाबद्दल बीसीसीआयने म्हटले आहे की ‘चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीवर जयपूरमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 50 टक्के मॅच फीचा दंड करण्यात आला आहे.’

बीसीसीआयने धोनीवर आयपीएलच्या आचारसंहितेचा कलम 2.20 च्या अंतर्गत लेवल 2 गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे त्याला हा दंड ठोठवण्यात आला आहे. धोनीने ही शिक्षा मान्य केली आहे.  कलम 2.20 हे ‘खिलाडूवृत्तीच्या विरोधातील कोणतेही आचरण’ या संदर्भात आहे.

नक्की झाले काय?

या सामन्यात राजस्थानने चेन्नईसमोर प्रथम फलंदाजी करताना 152 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावल्या. पण त्यानंतर धोनी आणि अंबाती रायडूने अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या डावाला आकार दिला.

मात्र रायडू 57 धावांवर 18 व्या षटकात बाद झाला आणि धोनी 20 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर 58 धावांवर असताना बाद झाला. दोघांनाही बेन स्टोक्सने बाद केले.

यावेळी धोनी बाद झाल्यानंतर पुढचाच चेंडूवर मैदानावरील पंचांनी नो बॉलचा इशारा केला, पण लगेचच स्वेअर लेगवरील पंचांशी चर्चा करुन हा नो बॉलचा निर्णय बदलला. त्यामुळे मैदानात असलेला रविंद्र जडेजा पंचाशी वाद घालू लागला. काही वेळीत धोनीही मैदानात आला, त्याने पंचाशी चर्चा करत वाद घातल्याचे दिसले.

मात्र पंचांनी निर्णय बदलला नाही. त्यामुळे चेन्नईला नो बॉल मिळाला नाही. अखेर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना मिशेल सँटेनरने षटकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच चेन्नईने या मोसमातील 6 वा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वस स्थान अधिक भक्कम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…

सुरेश रैनाच्या त्या विक्रमाची बरोबरी करण्याची रोहित शर्माची संधी हुकली!

मुंबईचा राजा एकच! मुंबई इंडियन्सचे किंग्स इलेव्हन पंजाबला सोशल मीडियावर प्रतिउत्तर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment