आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा आयपीएल चषक मिळवून देणारा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या 14व्या मोसमात सध्या त्याची बॅट अजूनही शांत असली तरी बुधवारी (21 एप्रिल) रोजी त्याच्या संघाने कोलकता नाइट रायडर्सवर 18 धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात धोनीने आयपीएल लीगच्या इतिहासात प्रथमच सुनील नारायणच्या गोलंदाजीवर चौकार लावला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना तीन गडी गमावून 224 धावा केल्या आणि त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकत्ता संघाने 19.1 षटकांत सर्वबाद 202 धावा केल्याने त्यांना 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.
या सामन्यातील 17 व्या षटकात मोईन अलीला सुनील नारायणने बाद केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करण्याकरीता मैदानावर आला. त्यानंतर याच षटकात सुनील नारायणने एक नो बॉल टाकला. त्यामुळे सुनिल नारायणच्या पुढीच्या फ्री-हीट चेंडूवरती महेंद्रसिंग धोनीने चौकार लावला. त्याने लावलेला हा चौकार आयपीएल इतिहासातील सुनील नारायणच्या गोलंदाजीवर लावलेला पहिला चौकार होता. यासाठी त्याला जवळजवळ 65 चेंडूंची वाट पहावी लागली. या सामन्यात धोनीने 8 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 17 धावा केल्या आणि एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॉर्गनच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.
आयपीएलमध्ये धोनीने 2012 मध्ये प्रथमच सुनील नारायणच्या गोलंदाजीचा सामना केला होता. त्यानंतर धोनीला एकदाही या फिरकीपटूच्या गोलंदाजीवर चौकार मारता आला नाही. या आठ वर्षात त्याने नारायणच्या 63 चेंडूंचा सामना केला असून यामध्ये त्याला फक्त 30 धावा करता आल्या होत्या.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने सलामीवीर फाफ डू प्लेसिसच्या नाबाद 95 आणि रुतुराज गायकवाडच्या 64 धावांच्या खेळीमुळे 220 धावा फलकावती लावल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकता संघाकडून पॅट कमिन्सने नाबाद 66 आणि आंद्रे रसेलने 54 धावा केल्या परंतु बाकी फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. सीएसकेने मिळवलेल्या या विजयामुळे त्यांनी गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने हा सदस्य करणार पुनरागमन