भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. धोनीने युवा खेळाडूंचे भविष्य घडवण्यासाठी एमएस धोनी ग्लोबल स्कूल यामध्ये सुपर किंग्स अकादमीचे उद्घाटन केले. हा सोहळा सोमवारी (दि. 10 ऑक्टोबर) होसुर येथे पार पडला. खरं तर, धोनीने तमिळनाडूच्या होसुर येथे सुपर किंग्स अकादमी सुरू केली आहे, ज्यामध्ये 8 खेळपट्ट्या आहेत. तसेच, सरावासाठी टर्फ आणि सामन्यांसाठी एक टर्फ क्रिकेट मैदानही आहे. विशेष म्हणजे, एमएस धोनी ग्लोबल स्कूल भारतातील पहिली फ्रँचायझी मालकीची सुपर किंग्स अकादमी आहे.
क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनानंतर धोनीचे वक्तव्य
एमएस धोनी क्रिकेट अकादमी (MS Dhoni Cricket Academy) याचे उद्घाटन केल्यानंतर धोनी (MS Dhoni) याने भाष्य केले. तो म्हणाला की, “परंतु हे देखील महत्त्वाचे आहे की, शाळा हा तो काळ आहे, जिथे तुमचे चारित्र्य विकसित होते. ही छोटी वैशिष्ट्ये आहेत, ज्यांना तुम्ही अधिक मजबूत करू इच्छिता. जसे की, तुम्हाला वक्तशीर व्हायचे आहे अशा साध्या गोष्टी. तिथेच तुम्हाला शिस्त लावायची आहे. तुम्हाला वडिलधाऱ्या व्यक्तींचा आणि शिक्षकांचा आदर करायचा आहे.”
https://www.instagram.com/p/Cje7-GfL6zo/?utm_source=ig_web_copy_link
“तुम्हाला रोज शिकत राहायचे आहे. मला नेहमीच असे वाटले आहे की, शाळा ही अशी वेळ असते जेव्हा तुमचे चारित्र्य मजबूत झाले की ते तुमच्यासोबत खूप काळ टिकते आणि ते तुम्हाला खरोखर परिभाषित करते. आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या सभोवतालच्या सर्व पायाभूत सुविधांचा पुरेपूर फायदा घ्या.”
MS Dhoni has opened a franchise owned Super Kings academy with 8 pitches in Hosur for future talents.
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2022
पुढे बोलताना धोनी म्हणाला की, “आम्ही या नवीन प्रवासासाठी खूपच उत्साही आहोत. जेव्हा आम्ही यावर्षी एप्रिलदरम्यान दोन केंद्रांमध्ये सुपर किंग्स अकादमीची सुरुवात केली होती, तेव्हा आम्हाला हे राज्य आणि देशाच्या इतर भागातही पसरवायचे होते. आनंद आहे की, आता आमच्या इथे होसुरमध्ये एक केंद्र आहे.”
Dhoni inaugurated the Super Kings Academy at the MS Dhoni Global School in Hosur. 🦁💛#WhistlePodu | @MSDhoni pic.twitter.com/Th1kfufi9Q
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) October 10, 2022
आयपीएलच्या मागील हंगामात सोडलेले कर्णधारपद
आयपीएल 2022मध्ये एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यावेळी त्याच्या जागी रवींद्र जडेजा याने संघाची धुरा सांभाळली होती. मात्र, संघाच्या खराब प्रदर्शनाने जडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा एकदा धोनीकडे संघाचे नेतृत्व आले. चेन्नई सुपर किंग्स संघाला मागील हंगामात अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यांना प्लेऑफ सामन्यांसाठी क्वालिफायदेखील होता आले नव्हते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्वा रे फिल्डिंग! बाऊंड्रीच्या पलीकडून खेळाडूने आत ढकलला चेंडू, व्हिडिओत कैद झाला घडलेला प्रकार
‘भावा त्याने 700 गोल केलेत, रन नाही’, रोनाल्डोला शुभेच्छा देऊन युवराजने मारली स्वत:च्या पायावर कुऱ्हाड