तिरुअनंतपुरम | भारत विरुद्ध विंडीज सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विंडीजने पहिल्या डावात ३१.५ षटकांत सर्वबाद १०४ धावा केल्या.
हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा भारतीय भूमीवरील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरु शकतो.
कारण यानंतर टीम इंडियात भारतात कोणताही वन-डे सामना खेळणार नाही. तसेच जी टी२० मालिका टीम इंडिया भारतात खेळणार आहे त्या संघातून धोनीला वगळण्यात आले आहे.
यानंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वनडे मालिका खेळणार आहे. या दोन मालिकानंतर खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतील. त्यानंतर केवळ एक महिन्याचे अंतराने संघ विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होईल.
धोनी २०१९ विश्वचषकानंतर निवृत्ती घेईल असे बोलले जात आहे. त्यामुळे धोनीचा हा भारतातील शेवटचा सामना असु शकतो.
काय आहे धोनीची भारतातील कामगिरी-
आजचा सामना हा धोनीचा वनडेतील ३३२ वा सामना आहे. यातील १२७ सामने धोनी भारतात खेळला आहे. त्यात त्याने ५४.८१च्या सरासरीने ४४४० धावा केल्या आहेत. सचिनपाठोपाठ (६९७६) भारतात वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.
आयपीएलही असणार शेवटची-
ज्याप्रमाणे सचिनने शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर कोणत्याही स्तरावरील क्रिकेट खेळणे पुर्णपणे बंद केले त्याचप्रमाणे धोनीही असचं काहीतरी करु शकतो. धोनी आजपर्यंत ११पैकी ११ आयपीएल हंगाम खेळला आहे. त्यात ९३ सामन्यात त्याने ५०.११च्या सरासरीने १४८७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय
–भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा