---Advertisement---

धोनीचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे निधन; वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

On: मंगळवार, नोव्हेंबर 24, 2020 2:07 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे मार्गदर्शक राहिलेले देवल सहाय यांचे मंगळवारी (२४ नोव्हेंबर) निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांनी रांचीच्या मेडिका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

देवल सहाय यांना श्वास घेण्यात अडचण होती

मागील ३ महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे मेडिका रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना ९ ऑक्टोबरला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.

सहाय यांचा मुलगा अभिनव आकाशने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “घरी जवळपास १० दिवस घालवल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची तब्येत आणखी खालावली. मंगळवारी त्यांचे रांची येथे निधन झाले”

JSCA चे उपाध्यक्षपद भूषविले होते

देवल सहाय यांनी झारखंड राज्य क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष राहिले होते. १९९७-९८ मध्ये ते सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये त्यांनी संचालक म्हणून धोनीला स्टायपेंडवर ठेवले होते. धोनीची बायोपिक ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ यामध्येही देवल सहाय यांचा उल्लेख करण्यात आला आहे. धोनीला क्रिकेटमध्ये इतक्या उंचीवर पोहोचवण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली आहे.

खेळाडूंसाठी नोकरीचे मार्ग खुले केले

देवल सहाय मेकॉन, सीएमपीडीआय आणि सीसीएल मध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तिन्ही संस्थांमध्ये खेळाडूंसाठी निवडीचे मार्ग खुले केले. याचा सर्वाधिक फायदा क्रिकेटपटूंना मिळाला. यादरम्यान इतर खेळांमधील खेळाडूंचीही निवड झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीच्या फार्म हाऊसमधील टोमॅटो आणि दुधाची विक्री झाली सुरू; किंमती घ्या जाणून

“माझ्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एमएस धोनीच यष्टीरक्षक, त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही”

‘त्याच्या’ कामगिरीत पाचपट सुधारणा, भारताविरुद्धच्या सामन्याआधी पॉंटिंगकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूचे तोंडभरून कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---