चालू आयपीएल हंगामातील 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात यजमान संघ आरसीबीला 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सीएसकेसाठी 83 धावांची ताबडतोड खेळी करणारा डेवॉन कॉनवे सामनावीर ठरला. विजय मिळवल्यानंतर धोनीने आपल्या संघातील खेळाडूंचे कौतुक केले.
कॉनवेव्यतिरिक्त तुषार देशपांडे (Tushar Deshpande) याने सीएसकेसाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेत विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याचसोबत ‘जुनियर मलिंगा’ अशी ओळख असणाऱ्या मथिशा पथिराना (Matheesha Pathirana) यानेदखील 18 आणि 20व्या षटकात प्रत्येक एक-एक विकेट घेतली आणि सीएसकेला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी डेवॉन कॉनवे (Devon Conway) याच्या साथीने शिवम दुबे यानेही 52 धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 6 बाद 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 20 षटकात 8 बाद 218 धावांपर्यंत मजल मारली. सामना जिंकल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) याने आपल्या विधानात शिवम दुबे आणि डेवॉन कॉनवे यांचे तोंड भरून कौतुक केले. सोबत शेवटच्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्याबद्दल गोलंदाजांचे विशेष कौतुक धोनीकडून केले गेले.
धोनीकडून शिवम दुबेचे कौतुक –
सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला, “जेव्हा तुम्ही बेंगलोरमध्ये खेळायला येता, तेव्हा याठिकाणीच खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच फायदेशीर अशते. शिवम दुबे एक असा खेळाडू आहे, जो चेंडूवर चांगल्या पद्धथीने हिट करतरो. वेगवान गोलंदाजांसमोर खेळताना त्याला अडचण येते, पण फिरकी गोलंदाजांसमोर तो अप्रतिम खेळू शकतो. आम्ही त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची योगजा आखली आहे. मला वाटते तो अशा खेळाडूंपैकी आहे, ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.”
“220 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी विरोधी संघाला आक्रमक पद्धतीने फलंदाजी करावी लागते. (ग्लेन) मॅक्सवेल आणि फाफ (डू प्लेसिस) अशाच पद्धतीने खेळत राहिले असते, तर त्यांना 18 व्या षटकात सामना जिंकला असता. यष्टीपाठी उभा राहून मी या गोष्टी समजून घेत होतो. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणे युवा खेळाडूंसाठी सोपे नसते. पण ते (तुषार देशपांडे, मथिश पथिराना) ड्वेन ब्रावोच्या मार्गदर्शनाखाली चांगले प्रदर्शन केले आहे.” (MS Dhoni praised his players after defeating RCB in Bangalore)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मॅक्सवेल-प्लेसिसची फिफ्टी व्यर्थ, बेंगलोरच्या बालेकिल्ल्यात चेन्नईचा दणदणीत विजय
विराटसाठी धक्यावर धक्के! सीएसकेविरुद्ध पराभवनंतर आयपीएलकडून मोठी कारवाई, जाणून घ्या चूक