---Advertisement---

धोनी आऊट व्हायचं नावच घेत नाही, कसं ते वाचा थोडक्यात

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी रॉयल चॅलेंजर बेंगलोरविरुद्धच्या गेल्या ४ सामन्यात नाबाद राहिला आहे. त्याला या ४ सामन्यात बाद करण्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या कोणत्याही गोलंदाजाला यश मिळाले नाही. शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर असा सामना होत आहे. अशातच या विक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.

धोनीने रॉयल चॅलेंजर बेंगलोरसंघाविरुद्ध आजपर्यंत ७९४ धावा केलेल्या आहेत. बेंगलोरविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. तर गमतीचा भाग म्हणजे चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे.

गेल्या ४ सामन्यात बेंगलोरविरुद्ध धोनीने ४८ चेंडूत नाबाद ८४, २३ सामन्यात नाबाद ३१, ३४ चेंडूत नाबाद ७० व १७ चेंडूत २१ धावा केल्या आहेत. या सर्व सामन्यात धोनीचा स्ट्राईक रेट हा अतिशय उत्तम राहिला आहे. विशेष म्हणजे त्याने या ४ सामन्यात बाद न झाल्यामुळे त्याची सरासरी इनफिनीटी आहे.

गेल्या ४ सामन्यात बेंगलोरविरुद्ध धोनीची कामगिरी
नाबाद ८४ धावा, ४८ चेंडू
नाबाद ३१ धावा, २३ चेंडू
नाबाद ७० धावा, ३४ चेंडू
नाबाद २१ धावा, १७ चेंडू

महत्त्वाच्या बातम्या-

”केवळ ‘या’ कारणामुळे आम्ही सामना गमावला” दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर स्मिथने दिली प्रतिक्रिया

रिषभ, अय्यर धावबाद झाले आणि दिल्लीने नोंदवला ‘हा’ नकोसा विक्रम

आयपीएलमध्ये संघर्ष करत असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने ‘या’ ३ खेळाडूंना द्यायला हवी अंतिम ११ जणांमध्ये संधी

ट्रेंडिंग लेख-

IPL 2020: पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम

शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून

शेन वॉर्नच्या ‘त्या’ चेंडूला रिची बेनो यांनीच म्हटले होते शतकातील सर्वोत्तम चेंडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---