भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सातत्याने चर्चेत असतो. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल 2023 च्या चेन्नई सुपर किंग्सच्या सराव सत्रात तो सराव करत असताना त्याच्या फिटनेसची भरपूर चर्चा झाली. आता आयपीएल सुरू होण्यासाठी आठवडाभराचा अवधी शिल्लक असतानाच धोनी पुन्हा एकदा बातम्यांमध्ये येऊ लागला आहे. कारण, सध्या धोनी जोधपूर येथे भारतीय सैन्यासह असल्याची छायाचित्रे व्हायरल होतायेत.
धोनी याला भारतीय सैन्यातर्फे टेरोटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी देण्यात आली आहे. 2011 पासून धोनी या पदावर कार्यरत असून तो सातत्याने भारतीय आर्मीसोबत दिसतो. नुकताच धोनी जोधपूर येथील आर्मी कॅम्पमध्ये पोहोचला. यावेळी त्याने तेथील जवानांसोबत काही वेळ घालवला.
MS Dhoni in the army uniform in Jodhpur. pic.twitter.com/pXql9JhO9K
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 23, 2023
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, धोनी ज्यावेळी विमानतळावर पोहोचला त्यावेळी त्याला घेण्यासाठी कोणीही आले नव्हते. विशेष म्हणजे त्याला मास्क घातला असल्याने कोणीही ओळखू शकले नाही. काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याची ओळख पटवल्यानंतर, त्याच्या भोवती चाहत्यांचा गराडा पडला. मात्र, त्याच दरम्यान सैन्यातील अधिकारी तेथे पोहोचल्याने धोनी लवकर कॅम्पमध्ये दाखल झाला.
MS Dhoni in Army uniform. pic.twitter.com/Kh9g9AQTNf
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2023
धोनी विमानतळापासून कॅम्पमध्ये जात असतानाचा एक व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होतोय. तसेच आर्मीच्या गणवेशातील त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर दिसून येत आहेत. धोनी यापूर्वी देखील अनेकदा आर्मी जवानांसोबत वेळ घालवताना दिसलेला. 2019 वनडे विश्वचषकानंतर धोनीने काश्मीर येथे 15 दिवस सेवा दिली होती. यावेळी कोणतीही खास सेवा न घेता तो जवानांसोबत राहिला होता.
(MS Dhoni Spend Time With Indian Army In Jodhpur Before IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडते फक्त ऑस्ट्रेलियाच! भारतात येऊन पाच वर्षात तीनदा दिलाय धोबीपछाड
“आयपीएल सुरू झाल्यावर असे पराभव विसरले जातील”, दिग्गजाने कर्णधार व प्रशिक्षकांना सुनावले