भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघ आयपीएलच्या तयारीसाठी २१ ऑगस्टला दुबईला पोहोचला आहे. परंतु, त्यांच्या संघातील अनेक सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांच्यासमोरील संकटे वाढली आहेत. अशात सीएसके संघाचा कर्णधार एमएस धोनीने संघाचे मालक श्रीनिवासन यांना विश्वास दिला आहे की, जरी कोरोनाची प्रकरणे वाढली तरी काळजी करु नका. MS Dhoni Told N Srinivasan Not To Worry About Increasing Covid-19 Cases
श्रीनिवासन बोलताना म्हणाले की, “मी धोनीसोबत बोललो आहे आणि त्याने मला आश्वासन दिले आहे की, जरी कोरोना संक्रमित खेळाडूंची संख्या वाढली, तरी चिंता करण्याची काही गरज नाही. श्रीनिवासन यांनी झूम ऍपवरुन सर्व खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यांना सुरक्षित राहण्यास सांगितले. कुणालाही निश्चितपणे माहिती नाही की, कोण कोरोनाचा खरा वाहक आहे. मला एक शानदार कर्णधार मिळाला आहे. तो कोणत्याही गोष्टीमुळे चिंता करत नाही. त्याची हीच वागणूक सर्वांचा आत्मविश्वास वाढवत आहे,” असे ते पुढे बोलताना म्हणाले.
शिवाय सुरेश रैनाच्या भारतात परण्याबाबत बोलताना श्रीनिवासन म्हणाले की, “क्रिकेटपटू हे जुन्या काळातील अभिनेत्यांसारखे असतात. चेन्नई सुपर किंग्स हा संघ नेहमी एका कुटुंबाप्रमाणे राहिला आहे. त्यामुळे संघातील सर्व सिनियर खेळाडूंना सोबत राहण्याची शिकवण मिळाली आहे. माझे विचार हे आहेत की, जर तुमची खेळण्याची इच्छा नसेल तर तुम्ही परत जायले हवे. मी कुणालाही काहीही करण्यासाठी दबाव टाकणार नाही. कधी-कधी तुमचेच यश तुमच्या डोक्यावर चढते.”
युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२० ची सुरुवात होणार आहे. पण, सीएसके संघावरील संकटे वाढल्याचे दिसत असल्यामुळे असे म्हटले जात आहे की, सीएसके विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणारा पहिला सामना खेळला जाणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
हर्षा भोगलेंनी शेअर केला खास जूना फोटो; पहा ओळखू येतात का तूम्हाला त्यातील क्रिकेटर्स
चेस ऑलिंपियाड: भारतीय बुद्धिबळपटूंनी रचला इतिहास; पहिल्यांदा पटकावले सुवर्णपदक
….आणि एवढा महान क्रिकेटर श्रीनाथ सचिनची पँट घालूनच उतरला मैदानात
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार