Loading...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीची टीम इंडियात निवड होणे कठीण, पंतलाच मिळणार पसंती..

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. 15 सप्टेंबरपासून टी20 मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होईल. टी20 मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे, दुसरा आणि तिसरा टी20 सामना अनुक्रमे 18 आणि 22 सप्टेंबरला मोहाली आणि बंगळूरु येथे होणार आहे.

या मालिकेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. ही टी20 मालिका पुढीलवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या विश्वचषकाचा विचार करुन भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे.

यामुळे भारताचा अनुभवी यष्टीरक्षक एमएस धोनी ऐवजी रिषभ पंतला अधिक पंसती मिळेल. धोनीने 2019 विश्वचषकानंतर क्रिकेटमधून 2 महिने ब्रेक घेतला होता. त्यामुळे तो वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी अनुपलब्ध होता. पण आता त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही निवड न होण्याची शक्यता आहे.

याबद्दल बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारींनी पीटीआयला माहिती दिली की ‘2020 टी20 विश्वचषकमधील पहिला सामना खेळण्याआधी भारतीय संघ 22 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणार आहे आणि निवड समीतीने त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे की त्यांना आता पुढे जाण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.’

‘ते मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी विशेषत:टी20 मध्ये तीन यष्टीरक्षकांचा पूल तयार करण्याची योजना आखत आहेत.’

Loading...

असे असले तरी अजून बीसीसीआय किंवा निवड समीती धोनीशी त्याच्या पुढील योजनांबद्दल चर्चा करणार आहे की त्यांनी ही चर्चा आधीच केली आहे याबद्दल स्पष्टता नाही.

याबद्दल बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, ‘निवृत्ती हा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्याबद्दल निर्णय घेण्याचा अन्य कोणालाही अधिकार नाही. पण निवड समीतीला 2020 टी20 विश्वचषकासाठी योजना आखण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळेच रिषभ पंतला अधिक संधी मिळेल.’

त्याचबरोबर निवड समीती पंत नंतर संजू सॅमसन आणि इशान किशनचा यष्टीरक्षकाचा पर्याय म्हणून विचार करत असल्याचे समजले आहे.

निवड समीतीचे काही सदस्य भारत अ संघाच्या सामन्यांसाठी तिरुअनंतपुरमला जाणार आहेत. तिथे ते सॅमसनच्या कामगिरीवर लक्ष ठेवतील. भारत अ संघाची सध्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 5 वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवच्या 2 सामन्यात सॅमसन खेळणार आहे.

निवड समीतीच्या मते सॅमसन उच्चस्तरावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे पण त्याच्यातील यष्टीरक्षणाच्या कौश्यल्यावर अजून काम करावे लागणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

श्रीलंकेचा ‘मिस्ट्री स्पिनर’ अजंता मेंडीसची क्रिकेटमधून निवृत्ती

Loading...

…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

‘या’ सामन्यासाठी टिम पेन नाही तर हा खेळाडू करणार ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व

You might also like
Loading...