---Advertisement---

धोनी दिसला हिमाचल प्रदेशमधील पारंपारिक टोपीमध्ये; नव्या लूकसह चाहत्यांना खूश करतानाचा व्हिडिओही व्हायरल

---Advertisement---

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीनी मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो इंडियन प्रीमीयर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसतो. मात्र, सध्या आयपीएल २०२१ स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने चाहत्यांना धोनीचे दर्शन खूप कमी वेळा होते. बहुतेकवेळा त्याची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर काही पोस्ट केल्यासच चाहत्यांना धोनीला पाहाता येते.

काही दिवसांपूर्वीच रांची येथील फार्महाऊसवर धोनीने घोड्या सोबत शर्यत लावलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच्या अगोदर घोडा आणि त्यांचा पाळीव कुत्रा या सोबत खेळत असलेला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशाच एका कारणामुळे सध्या धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

धोनी आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत शिमला येथे सुट्टीसाठी गेला आहे. भारत सरकारने कोविड-19 नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर धोनी हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्यासाठी गेला आहे. धोनीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि देशातील वेगवेगळी पर्यटन स्थळे पाहायला खूप आवडते. यावेळेस ते शिमलामध्ये गेला आहे.

शिमलामधील धोनीचा नवीन लूक
हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या धोनीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. परंतु, या सर्व फोटोमधील चाहत्यांना धोनीचा एक फोटो खूप आवडला आहे. ज्यामध्ये धोनीने हिमाचल प्रदेशची पारंपारिक टोपी घातली आहे. या टोपीला कुल्लू टॉप म्हणून ही संबोधले जाते. ही टोपी शिमलामधील जवळजवळ सर्वचजण परिधान करतात.

शिमलामधील पारंपारिक टोपी परिधान करण्यात व्यतिरिक्तही यांचा धोनी यांचा नवीन लुक समोर आले आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यावेळेस त्यांनी दाढी कमी केली आणि मिशी ठेवली आहे. धोनीला गाड्यांची खूप आवड आहेच, त्यासोबतच तो त्याच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग देखील करतात. या नव्या लूकसह धोनी आपल्या काही चाहत्यांना भेटतानाही दिसला आहे. यावेळी त्याने स्वाक्षरी देऊन चाहत्यांना खूश केल्याचे दिसले.

https://www.instagram.com/p/CQYmd54l2WX/

धोनीला मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना अजून थोडी वाट पहावी लागेल. कारण आयपीएल 2021 चे उर्वरित सामने खेळताना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्यावेळी धोनी खेळताना दिसणार आहे. धोनीच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2021 च्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केवळ अफलातून! जबरदस्त क्षेत्ररक्षणाने जिंकली न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मने, पाहा व्हिडिओ

WTC फायनलमध्ये भारतीय गोलंदाजांना नाकीनऊ आणणारा ‘कायले जेमिसन’, जाणून घ्या त्याच्याविषयी काही खास गोष्टी

स्व:तावर बनविलेला मीम पाहून मायकेल वॉन म्हणतोय, ‘हे आवडलंय’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---