भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. विशेषत: 2019 विश्वचषकातील त्याच्या संथ खेळीमुळे, त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांमुळे तो मागील काही दिवसात चांगलाच चर्चेत राहिला. त्याच्या निवृत्तीबद्दल अनेकांनी विविध मते मांडली आहेत.
आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे की निवृत्तीबाबदचा निर्णय धोनीनेच घ्यायला हवा.
इंडिया टूडेशी बोलताना गांगुली म्हणाला, ‘प्रत्येक मोठ्या खेळाडूला निवृत्ती घ्यावी लागते. हा खेळ आहे. फुटबॉलमध्ये पहा, मॅराडोनानेही निवृत्ती घेतली. त्याच्यापेक्षा मोठा खेळाडू नाही. तेंडूलकर, लारा, ब्रॅडमन सर्वांनी निवृत्ती घेतली आहे. अशाच प्रकारची ही प्रणाली आहे आणि ती राहिल. त्यामुळे ही परिस्थिती धोनीवरही येणार आहे.’
‘आत्ता तो त्याच्या कारकिर्दीच्या अशा स्तरावर आहे ज्याचे त्याला मुल्यमापन करायचे आहे. त्यानेच ठरवायचे आहे की तो भारताला सामने जिंकून देऊ शकतो का. तो जर अन्य खेळाडूंप्रमाणे नाही तर एमएस धोनीप्रमाणेच योगदान पुढेही देऊ शकणार आहे का.’
तसेच गांगुली पुढे म्हणाला, ‘कारण धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर जो पर्यंत खेळत असतात तोपर्यंत त्यांच्याकडून ते सामना जिंकून देतील हीच अपेक्षा केली जाते. मला वाटते धोनीनेच हा निर्णय घ्यायला हवा. कारण फक्त खेळाडूला माहित असते की त्याच्यात किती खेळ बाकी आहे आणि त्याच्यात सामना जिंकून देण्याची कितपत क्षमता आहे.’
याबरोबरच धोनी कायमस्वरुपी खेळणार नाही ही वस्तुस्थिती भारतीय संघाने स्विकारयला हवीे हे सांगताना गांगुली म्हणाला, ‘भारतीय संघाने धोनी कायमस्वरुपी खेळणार नाही ही वस्तुस्थिती स्विकारून खेळण्याची सवय करुन घ्यायला हवी. तो खूप काळ आजूबाजूला राहणार नाही. पण हा निर्णय त्यानेच घ्यायला हवा.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या कारणामुळे रोहितला मिळाली नाही ११ जणांच्या टीम इंडियात संधी, विराटने केला खूलासा
–जसप्रीत बुमराह, बेन स्टोक्सची कसोटी क्रमवारी मोठी झेप
–यूएस ओपन: भारताच्या सुमित नागलने फेडरर विरुद्ध पहिला सेट जिंकत रचला इतिहास