भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आज एक खुलासा करताना गांगुलीने धोनीला एक मोठा खेळाडू बनवताना स्वतः कसा त्याग केला हे सांगितले. धोनीने वरच्या क्रमांकावर खेळायला यावे म्हणून गांगुलीने स्वतःची जागा धोनीला दिल्याचे सेहवागने म्हटलं आहे.
“आम्ही तेव्हा आमच्या फलंदाजी क्रमवारीत वेगवेगळे प्रयोग करत होतो. आम्ही तेव्हा ठरवलं होत की जर आम्हाला चांगले सलामीवीर मिळाले तर दादा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार. परंतु जर आम्हाला अपयश आले तर आम्ही पीच हिटरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणार होतो. ज्यामुळे धावगती वाढू शकेल. “
सेहवाग इंडिया टीव्हीशी बोलताना म्हणाला,
“गांगुलीने तेव्हा धोनीला तिसऱ्या क्रमांकावर तीन-चार सामन्यात संधी देण्याचे ठरवले. जगात असे खूप कमी कर्णधार आहेत जे स्वतःची जागा दुसऱ्या खेळाडूंना देतात. त्यात दादाने आधी माझ्यासाठी सलामीची जागा तर धोनीसाठी तिसऱ्या क्रमांकाची जागा दिली. जर दादाने तस केलं नसत तर धोनी मोठा खेळाडू बनू शकला नसता. “
सेहवाग पुढे म्हणतो,
“राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली धोनीला फिनिशरची भूमिका मिळाली. एक दोन वेळा तो खराब फटके मारून बाद झाला. त्याला त्यामुळे द्रविडच्या रागाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनतर त्याने पूर्णपणे बदलायचे ठरवले आणि एक चांगला फिनिशर झाला. त्याने युवराज बरोबर अतिशय चांगला भागीदाऱ्या केल्या. “