मागील अनेक दिवसांपासून युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या खराब कामगिरीमुळे चर्चेत आहे. त्याच्यावर अनेकांनी टिका केली आहे.
पण वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचा पंतवरील विश्वास कायम आहे. पण असे असले तरी त्यांनी पंतसाठी राखीव तीन यष्टीरक्षक तयार करण्याचेही काम सुरु असल्याचे सांगितले आहे.
प्रसाद इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, ‘मी याआधीच सांगितले आहे की विश्वचषकानंतर आम्ही रिषभच्या प्रगतीकडे लक्ष देणार आहोत. आपण त्याच्याबाबतीत संयम राखण्याची गरज आहे. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे.’
तसेच पंतच्या कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे, हे सांगताना प्रसाद म्हणाले, ‘आम्ही रिषभच्या कामाच्या ताणावरही लक्ष देत आहोत. तसेच आम्ही नक्कीच सर्व क्रिकेट प्रकारांसाठी राखीव यष्टीरक्षकही तयार करत आहोत.’
‘आमच्याकडे युवा यष्टीरक्षक केएस भरत आहे तो कसोटी क्रिकेटमध्ये भारत अ संघाकडून चांगली कामगिरी करत आहे. तसेच आमच्याकडे इशान किशन आणि संजू सॅमसन आहेत, जे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारत अ संघाकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत.’
त्याचबरोबर पंत कसोटीमध्ये यष्टीरक्षक म्हणून पहिली पंसती असावी की नाही हे भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘हे सर्व संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. त्यांना फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर चांगला यष्टीरक्षक हवा आहे.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–परदीप नरवालने तिसऱ्यांदा हे खास द्विशतक पूर्ण करत रचला इतिहास
–वाढदिवस विशेष: ‘सिक्सर किंग’ ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
–विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये झाले हे मोठे बदल