आयपीएलच्या सुरुवातीपासून विदेशी खेळाडूंचे भारतीय चाहत्यांशी खास नाते निर्माण झाले आहे. भारतीय खेळाडूं इतकेच चाहते परदेशी खेळाडूंवर प्रेम करतात आणि त्यांना पाठिंबा देतात. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅकक्लेनाघनने भारतीय चाहत्यांसोबतच्या अनुभवाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्क्लेनाघन (mitchell mcclenaghan) सध्या भारतात आहे आणि लिजेंड्स लीग क्रिकेट मध्ये मणिपाल टायगर्सचा भाग आहे. आपल्या घातक गोलंदाजीसोबतच 37 वर्षीय गोलंदाज सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि अनेकदा ट्विटरवर त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो आणि मजेदार उत्तरे देतो. डेहराडूनमधील पत्रकार परिषदेदरम्यान त्याला भारतीय चाहत्यांबाबतच्या अनुभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
याला उत्तर देताना ते म्हणाला, अनेक भारतीय चाहत्यांना व्यंग समजत नाही. त्यामुळे माझ्याकडे हा एकमेव पर्याय आहे आणि तो आनंददायक आहे. लोक मला गंभीरपणे घेतात, मला वाटत नाही की माझ्या तोंडातून काहीही गंभीरपणे बाहेर पडते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते नेहमीच माझ्या विरोधात असतात आणि त्यामागचे कारण मला माहीत नाही.
आरसीबीच्या चाहत्यांना मॅक्लेनाघन न आवडण्याचे एक मोठे कारण म्हणजे तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. आरसीबी आणि एमआय यांच्यातील स्पर्धा सर्वांनाच ठाऊक आहे.
विशेष म्हणजे की मॅक्लेनाघनने आयपीएलचे पाच हंगाम खेळले आणि यादरम्यान त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने 56 सामन्यांत 25.39 च्या सरासरीने 71 विकेट्स घेतल्या. या दरम्यान, त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 21 धावांत 4 विकेट्स होती, तर इकॉनॉमी रेट 8.94 होता.
आयपीएल व्यतिरिक्त, मॅकक्लेनाघन जगभरातील अनेक प्रमुख टी20 लीगचा भाग आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सध्या खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याला केवळ एकच बळी घेता आला आहे. (Mumbai bowler’s big statement about RCB fans Said RCB fans are always against me)
महत्वाच्या बातम्या
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये रोहितची बादशाहत संपली! ग्लेन मॅक्सवेलच्या शतकामुळे भारतीय कर्णधाराची डोकेदुखी वाढली
ऋतुराजच्या शो नंतर मॅक्सवेलचा ‘बिग शो’! वादळी शतकासह ऑस्ट्रेलियाला गाठून दिले 223 चे लक्ष्य