मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध नांदेड चांबल चॅलेंजर्स यांच्यात महत्वपूर्ण लढत झाली. नांदेड संघाने टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले असल्याने त्याच्या दृष्टीने हा सामना फक्त औपचारिकता होती. मात्र मुंबई शहर च्या दृष्टीने सामना अत्यंत महत्वाचा होता. पहिल्या 10 मिनिटात नांदेड संघाकडे 11-9 अशी आघाडी होती.
मध्यांतरा पर्यत दोन्ही संघांचे चढाईपटू आक्रमक खेळ करत होते. नांदेड संघाकडे मध्यांतर ला 20-19 अशी अवघ्या 1 गुणांची आघाडी होती. नांदेड कडून अक्षय सूर्यवंशी व अजित पवार तर मुंबई शहर कडून शार्दूल पाटील व राज आचार्य यांनी जबरदस्त खेळ केला. सामन्याची शेवटची 10 मिनिट शिल्लक असताना 32-26 अशी नांदेड संघाकडे आघाडी होती.
त्यानंतर मुंबई शहर संघाच्या चढाईपटूंनी आक्रमकता दाखवत सामन्यात चुरस आणली. 36-40 अशी आघाडी असताना मुंबई शहरच्या निखिल पाटील ने स्लो टॅकल करत सामना फिरवला. शेवटच्या दोन चढाईत राज आचार्य ने गुण मिळवत सामना 40-40 असा बरोबरीत सोडवला. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने 12 गुण मिळवले तर नांदेड कडून अक्षय सूर्यवंशीने सर्वाधिक 13 गुण मिळवले. नांदेडच्या ऋषिकेश भोजने व प्रणय चांदेरे ने 4-4 पकडी केल्या. (Mumbai City Maurya Mavericks vs Nanded Chambal Challengers Match Draw)
बेस्ट रेडर- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर्स- ऋषिकेश भोजने, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- निखिल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तिलक लवकरच टीम इंडियात खेळेल’, दमदार खेळीनंतर दिग्गजांचे झाले एकमत
‘वॉर्नर खरोखर चांगला खेळतोय?’, माजी दिग्गजाच्या मते प्लेऑफ्समधून दिल्लीचा बाहेर…