---Advertisement---

मुंबईची वन‌ फॅमिली बनली ग्लोबल! दक्षिण आफ्रिका आणि युएईतील फ्रॅंचाईजींच्या नावाची झाली घोषणा

On: बुधवार, ऑगस्ट 10, 2022 2:32 PM
Mumbai-Indians
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स आता जगभरातील इतरही टी२० लीगमध्ये दिसणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या या फ्रॅंचाईजीने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) होणाऱ्या इंटरनॅशनल लीग टी२० मध्ये तसेच दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या नव्या टी२० लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. आता त्या दोन्ही संघांची नावे देखील समोर आली आहेत.

आयपीएल सुरू झाली तेव्हा सर्वात महागडी फ्रॅंचाईजी असलेल्या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत १५ वर्षात सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला युएईत सुरू होणाऱ्या इंटरनॅशनल लीग टी२० मध्ये रिलायन्सने फ्रॅंचाईजी विकत घेतली होती. त्या फ्रॅंचायजीचे नाव आता एमआय एमिरेट्स असे केले गेले आहे. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याबाबत घोषणा केली गेली. मुंबई फ्रॅंचाईजीप्रमाणेच आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स ‌ या संघानी‌ देखील इंटरनॅशनल लीग टी२० मध्ये फ्रॅंचाईजी खरेदी केली आहे. त्यांची नावे अनुक्रमे दुबई कॅपिटल्स व अबुधाबी नाईट रायडर्स अशी ठेवली गेली आहेत.

 

यायाव्यतिरिक्त आयपीएलमधील सहा फ्रॅंचाईजींनी सहा संघ विकत घेतल्याने दक्षिण आफ्रिकेत होणारी नवी टी२० लीग चर्चेत आहे. या लीगमध्ये देखील मुंबईने संघ खरेदी केलेला. त्यांना केपटाऊन शहराची फ्रॅंचाईजी मिळाली होती. आता त्या फ्रॅंचायजीचे नाव एमआय केपटाउन असे ठेवले गेले आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत ही माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या लीगमध्ये मुंबई व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपरजायंट्स या संघांनी संघ खरेदी केले आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल लीग टी२० जगातील दुसरी सर्वात श्रीमंत क्रिकेट‌ लीग होऊ शकते. बिग बॅश, इंटरनॅशनल लीग टी२०,‌ दक्षिण आफ्रिका टी२० लीग व‌ बांगलादेश प्रीमियर लीग या सर्व लीगच्या तारखा एकाच वेळी येत असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतासाठी धोक्याची घंटा! झिम्बाब्वेच्या कर्णधाराचे १४ वर्षांत पहिलेच शतक, षटकार-चौकारांचा पाडला पाऊस

ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाच्या ४ वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराचा क्रिकेटपासून दूर राहण्याचा मोठा निर्णय

घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---