---Advertisement---

इंग्लंडमधील प्रदर्शनानंतर आयपीएल फ्रँचायझीही झाल्या हार्दिकच्या फॅन, शेअर केल्या एकापेक्षा एक भन्नाट पोस्ट

On: सोमवार, जुलै 18, 2022 11:58 AM
Hardik-Pandya-memes
---Advertisement---

भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यात टी-२० मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही नावावर केली. मालिकेतील पहिल्या सामना भारताने, तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला होता. अशात मालिका १-१ अशा बरोबरीवर असताना तिसरा आणि निर्णायक सामना भारताने जिंकला आणि मालिकाही नाववर केली. दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्याने या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले. हार्दिकच्या याच प्रदर्शनासाठी त्याची जुना आयपीएल संघ मुंबई इंडियन्स, तसेच इतर आयपीएल संघांकडून कौतुक केले गेले आहे.

हार्दिक पंड्याने या सामन्यात प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत महत्वपूर्ण प्रदर्शन केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ४२.१ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. हार्दिकने या सामन्यात टाकलेल्या ७ षटकांमध्ये २४ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर फलंदाजी करताना ५५ चेंडूत ७१ धावांचे योगदान दिले.

आयपीएल २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिकला संघातून वगळले होते. आता त्याच संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या प्रदर्शनासाठी त्याचे कौतुक केले गेले आहे. डावातील ३७ व्या षटकात हार्दिकने लियाम लिविंगस्टोन (२७) आणि जोस बटलर (६०) या दोन महत्वाच्या खेळाडूंना रवींद्र जडेजाच्या हातात झेलबाद खेले. मुंबई इंडियन्सने या षटकातील प्रदर्शासाठी हार्दिकचे कौतुक केले आहे.

आयपीएल २०२२ मध्ये हार्दिकने गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आणि संघाला ट्रॉफी देखील मिळवून दिली. त्यांचा कर्णधार हार्दिकने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात केलेल्या प्रदर्शनासाठी खास ट्वीट केले. त्यांनी असे, म्हटले आहे की, हार्दिक पंड्याने त्यांचा सुट्टीचा दिवस आनंदी बनवला आहे.

कोलकोता नाईट रायडर्सने हार्दिकच्या घेतलेल्या एकापाठोपाठच्या विकेट्सनंतर एक मजेशीर मीम शेअर केले.

राजस्थान रॉयल्सनेही हार्दिकच्या कौतुकात एक दमदार मीम शेअर केले आहे.

पंजाब किंग्जनेही हार्दिकने ज्या पद्धतीने एका शटकात दोन महत्वाच्या खेळाडूंना तंबूत धाडले, त्यासाठी कौतुक केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

VIDEO। कोहलीचं शतक नाही, पण त्याची डान्स स्टेप पाहून म्हणाल ‘वाह क्या बात है!’

इंग्लंडमध्ये मालिकावीर ठरलेल्या पंड्याला ‘हार्दिक’ शुभेच्छा, पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गजाला पछाडत रचलाय विक्रम

‘याच’ ४ खेळाडूंच्या जोरावर भारताने विश्वविजेत्यांना त्यांच्या धर्तीवर लोळवलंय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---