---Advertisement---

इंग्लंडमध्ये मालिकावीर ठरलेल्या पंड्याला ‘हार्दिक’ शुभेच्छा, पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गजाला पछाडत रचलाय विक्रम

On: सोमवार, जुलै 18, 2022 10:30 AM
Hardik-Pandya-and-Rohit-Sharma
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय संघाने रविवारी (१७ जुलै) जिंकली. मालिकेतील पहिला सामना भारताने, तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला होता. त्यानंतर मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडचा धूळ चारण्यासाठी रिषत पंत आणि हार्दिक पंड्याचे प्रदर्शन महत्वाचे ठरले. हार्दिकला त्याच्या अष्टपैलू योगदानासाठी सामनावीर निवडले गेले. दरम्यान, या सामन्यातील प्रदर्शनानंतर हार्दिकने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये एक खास विक्रम नोंदवला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या या निर्णायक सामन्यात भारताला विजायासाठी २६० धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्यत्तरात भारतीय संघाने ४२.१ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर २६१ धावा केल्या आणि विजय मिळवला. या विजयासोबत भारताने मालिका देखील १-२ अशा फरकाने नावावर केली. हार्दिकने प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी करताना जबरदस्त प्रदर्शन केले, आणि काही खास विक्रमही नावावर केले.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आता कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना एका सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा आणि ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा खेळेाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा दिग्गज मोहम्मद हफीज (Mohammad Hafeez) याच्या नावावर हा विक्रम होता. मात्र, भारतासाठी अशी कामगिरी करणारा हार्दिक पहिलाच खेळाडू ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध तिन्ही प्रकारांमध्ये चमकला हार्दिक पंड्या
कसोटी – ५२*, २८/५ विरुद्ध इंग्लंड (नॉटिंघम, २०१८)
एकदिवसीय – ७१, ४/२८ विरुद्ध इंग्लंड (मॅनचेस्टर, २०२२)
टी-२० – ५१, ४/३३ विरुद्ध इंग्लंड (साउथॅम्पटन, २०२२)

सामन्याचा विचार केला, तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ४५.५ षटकांमध्ये २५९ धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाची वरची फळी स्वस्तात बाद झाली. पण त्यानंतर आलेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) याने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. हार्दिक पंड्यानेही ५५ चेंडूत ७१ धावा ठोकल्या, ज्या संघासाठी खूपच महत्वाच्या होत्या.

गोलंदाजांचा विचार केला तर, भारतासाठी हार्दिक पंड्याने ७ षटकात २४ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने टाकलेल्या ९.५ षटकात ६० धावा खर्च केल्या, पण त्यानेही तीन खेळाडूंना फिरकीच्या जाळ्यात अडकवले. मोहम्मद सिराजने सुरुवातीच्या २ विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जडेजालाही एक विकेट मिळाली. इंग्लंडसाठी या मालिकेत अप्रतिम गोलंदाज ठरलेल्या रीस टोपलीने या सामन्यातही त्यांच्या संघासाठी सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

HAPPY BIRHDAY। धवन-पंतच्या प्रशिक्षकांनी सांगितलेलं ‘हा पुढे जाऊन धोनीची जागा चालवणार…’

‘याच’ ४ खेळाडूंच्या जोरावर भारताने विश्वविजेत्यांना त्यांच्या धर्तीवर लोळवलंय

धोनीबाबत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे मोठे विधान! म्हणाला, ‘सामना जिंकण्यासाठी माझ्यावर विश्वास…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---