जयपुर | आयपीएल २०१९साठी लिलावात आतापर्यंत २८ खेळाडूंवर बोली लागली आहे. यातील अनेक खेळाडूंना कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही.
मुंबई इंडियन्स आतापर्यंत केवळ तीनच खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले आहे. त्यात लसिथ मलिंगाला २ कोटी, अनमोलप्रीत सिंगला ८० लाख तर बरिंदर स्रानला तब्बल ३.४० कोटी रुपये मुंबईने मोजले आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील एक यशस्वी संघ असून या लिलावात आतपर्यंत त्यांच्याकडे ८ कोटी रुपये खेळाडू खरेदीसाठी बाकी आहेत.
मुंबईकडे आतापर्यंत या हंगामात २१ खेळाडू झाले असुन त्यात ८ खेळाडू परदेशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा
–शिक्षणासाठी सोडलं होत क्रिकेट, आज ठरला सर्वात महागडा खेळाडू
–पाच चेंडूत पाच षटकारांची बरसात करणारा मुंबईकर झाला कोट्याधीश