मुंबई: मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअल संघाने १६ वर्षांखालील मुलांच्या गटात आज मोठ्या विजयाची नोंद केली. आर्यन आगळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअल संघाने मिरारोडच्या सेव्हन स्क्वेअर अकादमी संघावर २२६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना आर्यनच्या ६१ चेंडूंत ८४ आणि सोहम सालीच्या ७६ धावांच्या जोरावर अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअल संघाने ३९ षटकांत १ बाद २९० धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या सेव्हन स्क्वेअर अकादमीच्या फलंदाजांनी आर्यनच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. आर्यनने ३ निर्धाव षटके टाकून ७ विकेट्स घेत सेव्हन स्क्वेअर अकादमीचा संपूर्ण संघ १४.१ षटकांत ६४ धावांवर माघारी पाठवला.
मुंबई टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल संघाने ८ विकेट्स राखून एसव्हीकेएम जेव्ही पारेख ( विलेपार्ले) संघावर विजय मिळवला. स्वामी विवेकानंद संघाच्या रुद्रा टॅंकने ८ षटकांत ६ निर्धाव षटके टाकली आणि १२ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे एसव्हीकेएम जेव्ही पारेख ( विलेपार्ले) संघ ६९ धावांत तंबूत परतला. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल संघाने हे लक्ष्य २ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
अन्य सामन्यात अर्जुन जैस्वालची शतकी खेळी व्यर्थ ठरली. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलने ४० षटकांत ५ बाद २७७ धावा केल्या. वीर कपूर नाबाद ६२ आणि अभिराज गोएल ५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल ( वांद्रे) संघाचा डाव ३९.४ षटकांत २०७ धावांवर गडगडला. सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या अर्जुनने ९९ चेंडूंत १०६ धावा आणि १ विकेट्स घेऊनही संघाला विजय मिळवता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
१६ वर्षांखालील मुले
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) २ बाद ७२ ( इशान रॉय ४६*, मल्हार माने ११) वि. वि. एसव्हीकेएम जेव्ही पारेख ( विलेपार्ले) २९.५ षटकांत सर्वबाद ६९; सामनावीर – रुद्र टॅंक ( ८-६-१२-५)
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ४० षटकांत ५ बाद २७७ ( वीर कपूर ६२*, अभिराज गोएल ५६) वि. वि. सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल ( वांद्रे) ३९.४ षटकांत सर्वबाद २०७; सामनावीर – अर्जुन जैस्वाल, सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल ( ९९ चेंडूंत १०६ धावा आणि १ विकेट्स)
आयईएस नवी मुंबई हायस्कूल ( वाशी) बिनबाद ७६ ( प्रथमेश कडू ४४*, अजय पवार २३*) वि. वि. छत्रभूज नर्सी मेमोरियल स्कूल ( विलेपार्ले) ३६.१ षटकांत सर्वबाद ७२; सामनावीर – सोहम पोकळे ( ८-६-६-४)
आरव्ही नेरकर सेकंडरी स्कूल ( वसई) ७.१ षटकांत १ बाद ६० ( तनिष मेहेर २१*, रितिश पाटील १५) वि. वि. व्हिक्टोरिया हायस्कूल २७.५ षटकांत सर्वबाद ५९; सामनावीर – सिद्धार्थ म्हात्रे ( ४ विकेट्स)
आयईएस न्यू इंग्लिश स्कूल ( वांद्रे) ३३ षटकांत ३ बाद ३२८ ( संस्कार पाणस्कर ७५*, यश राजन ६४*) वि. वि. आरएन पोदार स्कूल सीबीएसई १४.३ षटकांत ८ बाद ४४; सामनावीर – संस्कार पाणस्कर ( ५१ चेंडूंत नाबाद ७५)
अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअल ३९ षटकांत १ बाद २९० ( आर्यन आगळे ८४, सोहम साली ७६) वि. वि. सेव्हेन स्क्वेअर अकादमी ( मिरारोड ) १४.१ षटकांत सर्वबाद ६४; सामनावीर- आर्यन आगळे ( ६१ चेंडूंत ८४ धावा आणि ७ विकेट्स व ३ निर्धाव षटके)
सरस्वती विद्यालय ( ठाणे) १०.२ षटकांत २ बाद ७३( मोहैक हिंदईकर १७) वि. वि. दी नॅशनल कन्नड ईएसएचएस २०.५ षटकांत सर्वबाद ७२; सामनावीर – कार्तिक बोरकर ( ४ विकेट्स)
१४ वर्षांखालील मुले
शारदाश्रम विद्यामंदिर ( दादर) ६ षटकांत १ बास ३४ ( इशान पाटकर १६*) वि. वि. रायन इंटरनॅशनल स्कूल ( नालासोपारा) १६.३ षटकांत सर्वबाद ३३; सामनावीर – अथर्व भगत ( ५ विकेट्स)
श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ४ बाद ७३ ( निरेल गावंड ३४*, आर्णव वानखेडे १८*) वि. वि. जीबीसीएन इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) २२.४ षतकांत सर्वबाद ७२; सामनावीर- अर्णव वानखेडे ( नाबाद १८ धावा आणि ३ विकेट्स)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ( कांजुरमार्ग) २९.२ षटकांत सर्वबाद १७६ ( स्वयम मोहिते ७७,कुशल शिरोडकर १८) वि. वि. यशोधाम हायस्कूल ( गोरेगाव) २६.१ षटकांत सर्वबाद ६६; सामनावीर- स्वयम मोहिते ( ५८ चेंडूंत नाबाद ७७ धावा)
बॉम्बे स्कॉटिश स्कूल सर्वबाद २३१ ( अनिरुद्ध शेळके ५२, अर्णव म्हाम्ब्रे २३) वि. वि. आरआर एज्युकेशन ट्रस्ट इंग्लिश मीडियम हायस्कूल २१.४ षटकांत सर्वबाद ८४; सामनावीर – ध्रुव <s