मुंबई इंडियन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ आहे. या संघाने आतापर्यंत आयपीएलचे ४ विजेतेपद आपल्या नावावर केले आहेत. तोही एक विक्रमच आहे. आतापर्यंत अन्य कोणताही संघ एवढ्या वेळा विजेतेपद जिंकू शकला नाही, तर ३ विजेतेपदासह चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. यामुळेच मुंबई हा सर्वात लोकप्रिय संघ आहे.
मुंबई संघात बरेच दिग्गज खेळाडू खेळतात. रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी कॉक आणि लसिथ मलिंगासारखे दिग्गज खेळाडू मुंबई संघाचा भाग आहेत. यामुळेच सोशल मीडियावर ही बरेच लोक मुंबईच्या संघाला फॉलो करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर त्यांचे बरेच चाहते झाले आहेत. त्यातच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. आयपीएलच्या अन्य कोणत्याही संघाच्या इंस्टाग्रामवर एवढे चाहते झालेले नाहीत. मुंबई इंडियन्स असा कारनामा करणारा पहिला संघ ठरला आहे.
तर यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ४.८ मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत, तर विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे ४ मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत. जर आयपीएलच्या अन्य संघांबद्दल बघितलं तर त्यांच्याकडे २ मिलियन ही फॉलोअर्स नाहीत.
कोलकाता नाईट रायडर्स २ मिलियनच्या जवळपास आहे, तर २०१६ ची चॅम्पियन सनराईझस हैद्राबाद यांचे १.५ मिलियन एवढे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. दिल्ली कॅपिटल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांचे अनुक्रमे १.४ एवढे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत व २००८ साली पहिल्याच आयपीएलच्या हंगामात विजेतेपद पटकाविलेला चॅम्पियन संघ राजस्थान रॉयल्स १ मिलियन फॉलोअर्स सह शेवटच्या स्थानी आहे.
मुंबई इंडियन्स संघाकडे एवढे फॉलोअर्स असण्याची बरीच कारणे आहेत. संघाकडे वेगवेगळ्या देशांचे जबरदस्त स्टार खेळाडू आहेत. याव्यतिरिक्त संघ हंगामाच्या एका वर्षाआड जबरदस्त प्रदर्शन करत आहे. त्यातच रोहित शर्मामुळे संघाला चाहते जास्तच पसंती देतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-एक- दोन नाहीतर तब्बल ६ गोलंदाजांच्या ऍक्शनची बुमराहने केली नक्कल, व्हिडिओ होतोय व्हायरल
-मुंबईचा कर्णधार रोहितची २ वर्षाची मुलगी आहे खूपच हुशार, पहा व्हिडिओ
-सतत पराभव पाहणाऱ्या आरसीबीच्या कर्णधार कोहलीने केले मोठे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!
-यंदा आयपीएल पदार्पणातच हे ३ युवा फलंदाज ‘ऑरेंज कॅप’ चे आहेत प्रमुख दावेदार
-मिस्टर आयपीएल रैनाच्या जागी हे ४ खेळाडू बनतील चेन्नई संघाचे उपकर्णधार