टी२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार असलेला हार्दिक पांड्या हा एक यशस्वी क्रिकेटपटू आहे. त्यांची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो, हार्दिक फक्त क्रिकेट खेळून पैसे कमवत नाही. तो अनेक ब्रँड्सच्या जाहिराती देखील करतो. याद्वारे त्याची पुष्कळ कमाई होते.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 च्या सुरुवातीपासूनच टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. मात्र असं असूनही त्याच्या ब्रॅन्ड इमेजला काही मोठा धक्का बसलेला नाही. आज या बातमीद्वारे जाणून घ्या की, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती आहे? त्याचा पगार किती आहे? आणि तो किती ब्रँड्सला एंडोर्स करतो?
29 फेब्रुवारी 2024 रोजी ‘स्पोर्ट्स कीडा’नं जारी केलेल्या एका अहवालानुसार, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती सुमारे 91 कोटी रुपये आहे. त्याची कमाई बहुतांशी क्रिकेट खेळून आणि जाहिरातीतून होते. ‘स्पोर्ट्स कीडा’नुसार, हार्दिक प्रत्येक महिन्याला सुमारे 1.2 कोटी रुपये कमावतो. जे त्याच्या आधीच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. त्याचा बीसीसीआयशीही करार आहे, ज्याद्वारे त्याला दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात.
हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सनं आयपीएल २०२२ पूर्वी १५ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. २०२४ च्या या हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सनं त्याला याच रकमेत करारबद्ध केलं आणि संघाचा कर्णधारही बनवलं. हार्दिक पांड्या ब्रँड एंडोर्समेंटमधून सुमारे ५५-६० लाख रुपये कमावतो. हार्दिक हालाप्ले, गल्फ ऑईल, स्टार स्पोर्ट्स, जिलेट, जॅगल, सिन डेनिम, डीएफवाय, बोट, ओप्पो, ड्रीम 11, रिलायंस रिटेल, विलन आणि एसजी क्रिकेट इत्यादी ब्रँड्सच्या जाहिराती करतो. याद्वारे त्याची भरपूर कमाई होते.
महत्त्वाच्या बातम्या –
माथिशा पाथिरानानं धोनीला दिला वडिलांचा दर्जा; म्हणाला, “धोनीमुळे मी…”