---Advertisement---

‘…तर जिंकलो असतो’, मुंबईच्या दुसऱ्या पराभवानंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया; सूर्यकुमारबद्दलही दिले अपडेट्स

Rohit-Sharma-Sanju-Samson
---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएल २०२२ ची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. मुंबईने राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांचा सलग दुसरा सामना गमावला, तर दुसरीकडे राजस्थानने मुंबईला २३ धावांनी मात देत लीगमधील सलग दुसरा विजय मिळवला. राजस्थानने दिलेले १९४ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्से गाठले पाहिजे होते, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले. मुंबईचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यासाठी अनुपस्थित होता आणि संघाला त्याची कमतरता नक्कीच जाणवली.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. ही दुखापत त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळताना झाली होती. याच कारणास्त तो मुंबईसाठी अद्याप १५ व्या आयपीएल हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma) सूर्यकुमारच्या दुखापतीवर बोलताना म्हणाला की, ‘जोपर्यंत त्याच्या हाताची दुखापत पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत त्याला खेळवून आम्ही कसलीही जोखीम पत्करू इच्छित नाही.’

रोहित म्हणाला की, ‘राजस्थान रॉयल्सने चांगली फलंदाजी करत १९३ धावा केल्या आणि जोस बटरलने (१००) अप्रतिम खेळी केली. आम्ही त्याला बाद करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण यश आले नाही. मला वाटते या खेळपट्टीवर १९३ धावांविरुद्ध विजय मिळवता आला पाहिजे होता. विशेषता जेव्हा तुम्हाला ७ षटकांमध्ये ७० धावांची गरज असेल. पण अशा गोष्टी होत असतात आणि आत्ताच स्पर्धा सुरू झाली आहे आणि आम्ही शिकू शकतो.’

रोहित पुढे सामन्यात त्यांच्यासाठी सकारात्मक ठरलेल्या गोष्टींवर देखील बोलला. तो म्हणाला की, ‘बुमराहने चांगली गोलंदाजी केली, सोबतच मिल्सनेही. त्याव्यतिरिक्त तिलक वर्मा आणि ईशान किशनची फलंदाजी चांगली होती. मला वाटते की, जर या दोघांपैकी एक शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला असता, तर फरक पडला असता आणि आम्ही जिंकू शकत होतो. त्यांनी बाद होणे संघासाठी निराशाजनक होते.’

पुढच्या सामन्यात सूर्यकुमार यादव उपस्थित राहील की नाही ? यावर रोहितने स्पष्ट मत व्यक्त केले नाही. तो म्हणाला की, तो महत्वाचा खेळाडू आहे. फिट होताच, तो थेट संघात येईल, पण मुंबई इंडियन्सची इच्छा आहे की, तो बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा व्हावा.

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Video: नुसती निराशा… राजस्थानविरुद्ध रोहित फक्त १० धावा करून बाद, पत्नी रितिकाने मुरडले नाक

Video | डोक्याला चेंडू लागला, तरीही कॅमेरामॅनने दिली केसाला धक्काही न लागल्यासारखी रिऍक्शन

शास्त्रींना स्वत:वर आहे भरपूर विश्वास; म्हणे, आयपीएल खेळलो असतो, तर ‘इतक्या’ कोटींना गेलो असतो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---