आयपीएल 2021 मध्ये शुक्रवारी (23 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर नऊ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 131 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर फलंदाजी करीता उतरलेल्या पंजाब संघातील फलंदाजांनी संयमी खेळी करत 17.4 षटकांत एक गडी गमावून हे लक्ष पूर्ण केले. या सामन्यानंतरच्या सादरीकरणात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त करत या पराभवाचे खापर संघातील फलंदाजांच्या माथ्यावर फोडले.
आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा याने संघातील फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरत या सामन्याच्या सादरीकरणात बोलताना म्हटले की, “ही खेळपट्टी फलंदाजीसाठी तशी वाईट नाही. परंतु या सामन्यात आम्ही जास्त धावा करू शकलो नाही. पंजाब संघाने ज्याप्रकारे फलंदाजी केली आणि नऊ गडी राखून हा सामना जिंकला, तुम्ही ते पहिले आहे.”
“या खेळपट्टीवर जर तुम्हाला 150-160 धावा करता आल्या; तर तुम्ही या सामन्यात टीकून राहू शकता. परंतु मागील दोन सामन्यांत आम्ही ही धावसंख्या उभी करण्यात अयशस्वी ठरलो. मला वाटते पंजाब संघातील गोलंदाजांनी पावर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. इशान किशन आणि मी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु यश येत नव्हते. मागील सामन्यांमध्ये आम्ही पावर प्लेमध्ये चांगल्या धावा केल्या, परंतु या सामन्यात अयशस्वी ठरलो. आमच्या संघातील मधली फळी सध्या चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरत असून या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करत आम्हाला काहातरी रणनीती आखावी लागेल,” असे त्याने पुढे म्हटले.
त्यानंतर सुर्यकुमार यादवला चार नंबरवर फलंदाजी करिता पाठवण्याबाबत बोलताना तो म्हणाला की, “आम्हाला या सामन्यातील मधल्या काही षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांविरूद्ध धावा करणारा फलंदाज हवा होता आणि आमच्यासाठी तो फलंदाज सुर्यकुमार यादव होता. तुम्हाला या अशा संघर्ष करायला nebCeJd/e खेळपट्टीवर खेळण्यासाठी सदैव तयार रहावे लागते. परंतु अशावेळी जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर योग्य वाटते अन्यथा वाईट वाटते.”
पुढे बोलताना, “आम्ही मैदानावर पर्यायी प्रयत्न करत नाही. परंतु अशा कठिण परिस्थितीवेळी आपल्याला कशी गोलंदाजी आणि फलंदाजी करायची आहे हे समजले पाहिजे.” असे तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
थ्री इन वन! राजस्थानचा गोलंदाज करतोय भज्जी, बुमराह आणि अश्विनसारखी गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
देवदत्त पडीक्कलसाठी लाल रंगाची जर्सी ठरतीये लकी? वाचा काय आहे नक्की कनेक्शन